तुमच्या डोळ्यांना व्हॉट्स अॅप वापरताना त्रास होतोय? मग करा 'ही' सेंटिंग

यिनबझ टीम
Wednesday, 4 March 2020

WhatsApp Dark Mode : काही काळांपासून अनेक व्हॉट्स अॅप युजरची एक मागणी होती, ती म्हणजे रात्री किंवा अंधारात व्हॉट्स अॅप वापरत असाताना त्रास होऊ नये, म्हणून काही नवीन फीचर्स लाँच करावेत, आता याच मागणीला घेऊन व्हॉट्स अॅपने त्याच्या युजर्ससाठी नवा प्लॅनिंग लाँच केला आहे.

WhatsApp Dark Mode : काही काळांपासून अनेक व्हॉट्स अॅप युजरची एक मागणी होती, ती म्हणजे रात्री किंवा अंधारात व्हॉट्स अॅप वापरत असाताना त्रास होऊ नये, म्हणून काही नवीन फीचर्स लाँच करावेत, आता याच मागणीला घेऊन व्हॉट्स अॅपने त्याच्या युजर्ससाठी नवा प्लॅनिंग लाँच केला आहे.

व्हॉट्स अॅपने आपल्या सेटिंग्समध्ये नवे फीचर मोड लाँच केले आहे, ज्याचे नाव व्हॉट्स अॅप डार्क मोड फीचर आहे. या फीचरचा फायदा असा असेल की तुम्ही अंधारात किंवा रात्री काळोखात व्हॉट्स अॅप वापरत असाल आणि त्याच्या ब्राईटनेसमुळे तुम्हाला त्रास होत असेल, तर तुम्ही व्हॉट्स अॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन डार्क मोड ऑन केला, की तुम्हाला कोणताही त्रास न होता, तुम्ही तुमच्या डोळ्यांना गरजेचा असेल तितक्याच ब्राईटनेसमध्ये व्हॉट्स अॅप वापरू शकता. 

व्हॉट्स अॅपने डार्क मोड फिचरला युजर्संना योग्य वाटण्यासाठी त्यात Readability आणि Information Hierarchy या दोन्ही फंक्शनचा वापर केला आहे. हे फिचर अँड्रॉयड आणि आयफोन अशा दोन्ही ब्रँडसाठी लागू करण्यात आले आहेत. 

कसे सुरू कराल, व्हॉट्सअॅप डार्क मोड फीचर
काही अँड्रॉयड धारकांना सेटिंग्सच्या सुरूवातीलाच हे ऑप्शन देण्यात आले आहेत, तर काही अँड्रॉयड आणि आयफोन धारकांना WhatsApp Settings > Chats > Theme > select ‘Dark असा ऑप्शन दिला आहे. त्यामुळे तुम्हाला जर अंधारात व्हॉट्स अॅप वापरताना त्रास होत असेल, तर तुम्ही जरूर या फीचरचा वापर करा.

फोन चोरीला गेला तरी टेन्शन नॉट, असं करा वॉट्स अॅप बंद

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News