तुम्हीदेखील तणावाखाली आहात? तर हे नक्की वाचा

यिनबझ टीम
Sunday, 8 March 2020

अनेकवेळा नैराश्‍य, मनस्ताप अशा गोष्टींमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. टेंशन, ताणतणाव यामुळे निर्माण झालेली चिडचिड, तसेच स्वभावात झालेला बदल अशावर सगळ्यांसाठी परिणामकारक उपाय करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. 

प्रत्येक सात भारतीयांमागे एका व्यक्तीला मानसिक विकार जडला असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. यामुळे नैराश्‍य आणि चिंता या सर्वसामान्य गोष्टी झाल्याचे समोर येत आहे.

1990 ते 2017 या काळात एकूण विकारांमध्ये मानसिक विकारांचे असलेले प्रमाण दुप्पट झाले आहे. नैराश्‍य, अतिचिंता, स्किझोफ्रेनिया, दुभंगलेले व्यक्तिमत्त्व, स्वभावातील टोकाचे बदल, आत्ममग्नता अशा विकारांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होतानाही आपल्या दिसून येते.

2017 मध्ये, भारतातील 19 कोटी 70 लाख जण मानसिक आजाराने ग्रस्त होते, त्यापैकी चार कोटी 60 लाख जणांना नैराश्‍य, तर साडेचार कोटी जणांना अतिचिंतेने ग्रासले होते. हे दोन्ही अत्यंत सर्वसामान्य विकार झाले असून, तो होण्याचे प्रमाणही वाढतच आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News