तुम्ही तणावाखाली आहात का? जाणून घ्या काय आहेत लक्षणे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 February 2020
  • आपण तणावाखाली असतो, हे देखील काहीवेळा कळत नाही. कामाच्या आणि घरच्या जबाबदाऱ्या एवढ्या असतात की, मुळात आपण तणावाखाली आहोत, हे अनेकांना जाणवत नाही.

आज प्रत्येकजण तणावाखाली असल्याचं पाहायला मिळतं. ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. तहानभूक विसरून सतत कामाकडे वळणाऱ्यांचे प्रमाण देखील यात तेवढेच आहे. मात्र प्रत्येकाला एका विशिष्ट प्रकारच्या तणावाचा सामना करावा लागतो. आपण तणावाखाली असतो, हे देखील काहीवेळा कळत नाही. कामाच्या आणि घरच्या जबाबदाऱ्या एवढ्या असतात की, मुळात आपण तणावाखाली आहोत, हे अनेकांना जाणवत नाही. मात्र याचे गंभीर परिमाण आपल्या शरीरावर होत असतात. 

केस गळती 
सामान्यपणे आपण बोलतो, केस खूप गळतात, मात्र केसगळती हे तणावाचे कारण देखील असू शकते. अचानकपणे आपले केस मोठ्या प्रमाणात गळण्यास सुरुवात होते. 

वजनात होणारा चढ-उतार 
सामन्यपणे तणावात असलेल्या व्यक्तीला अचानक भूक लागणे बंद होते. काहींना तणावात अति भूक लागते. अचानक जेवणात बदल झाल्यास वजनात होणारा बदल सहजपणे जाणवत.तणावामुळे शरीरातील पचनाची क्रिया मंदावते त्यामुळे काही वेळा वजन वाढते तर काहीवेळा वजन कमी होते. 

सतत विचार करत राहणे 
सतत कुठल्याही गोष्टीचा अति विचार करणे. यामुळे तणावात अधिकच भर पडते. या व्यक्ती अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळते. या सर्व गोष्टीमुळे स्वभावात चिडकेपणा येतो. यावेळी डॉक्टरचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. 

झोप वाढणे 
तणावात भर पडल्याने झोप देखील वाढते. शरीरातील हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात. मूड स्विंग्स होणे, डोकेदुखी, अपचन, या सर्व समस्या उद्भवू लागतात. 

इतर ताण 
हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, स्नायू जखडणे, अल्सर, डोक्यात आणि छातीत तीव्र सणक किंवा वेदना हे इतर त्रास देखील सुरु असतात. 

हा सर्व तणाव वेळेत मार्गी न लावल्यास विविध  परिणामांना सामोरे जावे लागते. तणावातून दूर राहण्यासाठी आपल्या आवडत्या गोष्टी कराव्यात. आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधावा. यामुळे बऱ्यापैकी ताण कमी होतो. यामध्ये आवश्यक वाटल्यास डॉक्टरांची मदत घ्यावी. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News