ठाकरे सरकारच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 August 2020

ठाकरे सरकारच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? कसे ? या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रुपमध्ये आज मनोसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

ठाकरे सरकारच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून झालेला वाद आपण पाहिला, त्याचबरोबर इतक्या वर्षांपासून असलेली भाजप आणि शिवसेनेची युती सत्ता स्थापनेच्यावेळी विभक्त झाली. त्यावेळी शिवसेना भाजपसोबत जाण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीच्या काही आमदारांनासोबत घेऊन सत्तास्थापन करण्याचा प्रयत्न केला. पण अखेरीस बहुमत सिध्द करण्यात भाजपाला अपयश आलं.

त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची मोट बांधण्यात पवार साहेबांना यश आलं. दीर्घ संघर्षानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली. हे सरकार अधिक काळ चालणार नाही अशी राज्यभर चर्चा होऊ लागली. उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदं हाती घेतलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारला सुरूवात झाली. पण काही महिने उलटले आणि कोरोना सारख्या महामारीन महाराष्ट्राला ग्रासलं. काही नागरिकांनी मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं. तर काहींनी टिका केली. ठाकरे सरकारच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? कसे ? या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रुपमध्ये आज मनोसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

जेव्हा मला हा प्रश्न कोणीही विचारतं, तेव्हा नेहमी असं वाटतं, मुळातच हे सरकार 'ठाकरे सरकार' आहे का ? कारण या 3 चाकाच्या सरकारचा रिमोट कंट्रोल बारामती मधून चालवला जातो असा अनेक तज्ञांचा दावा आहे. आजची राज्यातील राजकीय परिस्तिथी पाहता, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची त्रिसूत्री कुठेतरी बिघडलेली आहे असंच म्हणावं लागेल. मागील आठवड्यात महाराष्ट्राने जे काही पाहिलं, पवार साहेबांनी ज्या प्रकारे आपल्या नातवाचे कान टोचले, ते पाहता सर्व काही व्यवस्थित आहे, असं कसं म्हणता येईल. एकाच सरकार मध्ये असूनही कार्यकर्त्यांच्या मतात खूपच भिन्नता दिसून येत आहे. सरकारच्या एकंदरीत कामकाजाचा विचार केला तर विकासावर काय बोलणार? कारण सरकार विकासकामे चालू करायच्या आतच कोरोना ने कहर चालू केला. कोरोना मध्ये  सरकारने चांगलं काम केले आहे असं मला वाटत. काही गोष्टी नक्कीच अजून चांगल्या प्रकारे हाताळल्या जाऊ शकल्या असत्या, पण हा अनुभव कुठल्याच सरकार ला नव्हता, त्यामुळे trial and error हीच नीती योग्य होती, देशातील इतर राज्य देखील हेच करत आहेत. कालच महाराष्ट्राचा recovery rate 70% पेक्षा पुढे गेला आहे, ही खरंच दिलासा देणारी बातमी आहे. लवकरात लवकर सगळं व्यवस्थित होऊन, विकासकामे चालू व्हावीत, म्हणजे सरकारच्या विकासकामांवर विश्लेषण करता येईल.

केदार जोशी (डाटा एनालिस्ट, अँड्रोमेडा डिजिटल)

जेव्हा मला हा प्रश्न कोणीही विचारतं, तेव्हा अभिमानने सरकार विषयी positive गोष्टी सांगण्याचा आनंद होतो. हा प्रत्येक सरकारमध्ये सकारात्मक गोष्टी असतात आणि काही  negative गोष्टी पण असतात, हे मन्या करावे लागेल आपल्याला, प्रथमता आपण हे जाणून घ्यावं, की हे ठाकरे सरकार नसून हे गोर गरीब जनतेच सरकार आहे  आणि गोरगरीबांच्या मनातील सरकार आहे. या ठाकरे सरकारला तोडण्यासाठी भाजप सरकारने व त्याच्या आमदारांनी राजकारणातल्या शेवटच्या पातळीपर्यंत जाऊन निर्लज्य प्रयत्न केले. हे आपण बघितलेच. कोरोनाच्या काळात ठाकरे सरकारने गोरगरिब जनतेसाठी चांगलं काम केलं आहे.
महाराष्ट्राला एक उत्तम मुख्यमंत्री मिळाला आहे. तसेच ठाकरे सरकारकडून चांगले काम होईल यात तीळमात्र शंका नाही.

- नदीम डांगे (इंजिनिअर)

खरं तर हा विषय तसा फार गंभीर आहे, मला वाटतंय की ठाकरे सरकारला काम करण्याची संधी कमी मिळाली. पण माझं मतं असं आहे की, हे सरकार सेक्युलर आहे. कारण हे तुम्हाला खातेवाटपावरून समजले असेल.

- निसार नायकवडी (फौजी)

सरकारच्या कामावर बोलायचे कसे विकासाची कामे करण्यासाठी त्यांना वेळ कुठे मिळाला. एकतर सरकार स्थापन करण्यातच पूर्ण वेळ गेला. ते स्थापन होता-होता राज्यात महाराष्ट्र राजवट लागू झाली. कसे तरी सरकार स्थापन होऊन काम नीट चालू होत नाही तेच कोरोना रोग भारतात येऊन ठेपला. तर त्याच्या मागेच सर्व कामे लागली. तसं तर ठाकरे सरकार फक्त नावाला म्हणायचे का असं वाटतंय का ? तर मुख्यमंत्री ठाकरे असल्याने पण कामे तर सर्व बाकीच्यांच्या सल्ल्याने, आदेशाने होतात. माझं एक सरळ-सरळ मत आहे. जेव्हा महाराष्ट्र राज्याचा विकास करायचा असेल तर पक्षात विश्वास, प्रामाणिकपणा आणि एकसंधता हवी जर येथे तेच दिसत नाही. तर त्यांच्या कामगिरीवर काय बोलणार.

स्वाती शेषराव बडे (रूईया कॉलेज)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News