नर्सिंग आहात? मग 'या' शासकीय रुग्णालयात मिळू शकते नोकरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 23 September 2020

जर तुम्ही नर्सिंगचा डिप्लोमा केला नसेल तरीसुद्धा काही पदांसाठी शिक्षित तरुणांना नोकरीची संधी आहे. नर्सिंग, कक्ष सेवकसफाई कामगार अशा विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

सोलापूर: तुम्ही नर्सिंग केला आहात? तर एक चांगली नोकरीची संधी मिळू शकते. श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय  डॉवैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे नोकरीची संधी उपलब्ध आहेजर तुम्ही नर्सिंगचा डिप्लोमा केला नसेल तरीसुद्धा काही पदांसाठी शिक्षित तरुणांना नोकरीची संधी आहे. नर्सिंग, कक्ष सेवकसफाई कामगार अशा विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचा तपशील, पात्रता, अनुभव आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

पदाचे नाव आणि तपशील :

अनु. क्र पदांचे नाव       पदे

1.      नर्सिंग               70  

2.       कक्ष सेवक/      40

        सफाई कामगार

पद, शैक्षणिक पात्रता आणि वेतन

नर्सिंग- 70  पदे

  • बीएससी नर्सिंग उत्तीर्ण/
  • डिप्लोमा जीएनएम 
  • मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून उत्तीर्ण 
  • अनुभव असल्यास प्राधान्य 
  • वेतन- दरमहा 20 हजार रुपये

 

कक्ष सेवक/  सफाई कामगार - 40 पदे

  • दहावी पास/
  • सुशिक्षित असावा 
  • अनुभव असल्यास प्राधान्य 
  • वेतन- दरमहा 10 हजार रुपये 

 

अर्ज कसा करावा 

जाहीरातीमध्ये अर्जाचा नमुना दिला आहे, दिलेल्या नमुन्यात टंकलिखित किंवा हस्तलिखित अर्ज भरावा, त्यासोबत गुणपत्रिका, वयाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र जोडावे. दर मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी 3 ते 5 पर्यंत प्रशासकीय अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. 

 

मुलाखतीची अंतीम तारीख: 21 ऑक्टोंबर 2020

संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जाचा नुमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News