उन्हाळ्यात पायाला येणाऱ्या दुर्गंधीने हैराण आहात?, मग हे करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 April 2019
उन्हाळा आला की शरीरातून येणाऱ्या घामाचा प्रचंड त्रास होतो. त्यात अनेक जणांच्या पायाला नेहमी घाम येतो. त्यामुळे पायांना बऱ्याचदा दुर्गंधी येते. यामुळे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आपल्याला विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच पायांची दुर्गंधी घालविण्यासाठी या गोष्टी करा.

आल्याचा रस :

आल्याचा रस पायांना चोळा आणि त्यानंतर गरम पाण्याने पाय स्वच्छ धुवून टाकल्यास पायांना येणारी दुर्गंधी नाहीशी होईल.

बेकिंग सोडा :

बेकिंग सोडा हा घामाची pH लेव्हल सामान्य ठेवतो आणि बॅक्टेरिया नियंत्रित करतो. थोड्या कोमट पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि १५ ते २० मिनिटं पाय पाण्यात बुडवून ठेवा. काही आठवडे असे केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

लव्हेंडर ऑईल :

लव्हेंडर ऑईल चांगला सुंगधच देत नाहीत तर बॅक्टेरिया मारण्यासोबत पायांची दुर्गंधी नाहिशी करते. थोड्याशा कोमट पाण्यामध्ये काही थेंब लव्हेंडर ऑईलचे थेब टाकून पाण्यामध्ये काही वेळ पाय बुडवून ठेवल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

पायांची निगा राखा :

सगळ्यात शेवटी पण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शूज घालण्यापूर्वी आपले पाय स्वच्छ आहेत की नाही हे तपासून घ्या. कारण की बऱ्याचदा घाणेरड्या पायांनी शूज घातल्यास पायांना जास्त दुर्गंधी सुटते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News