फास्ट लाईफच्या नावाखाली माणुसकी विसरत चाललोय का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत...
  • नवतंत्रज्ञान, विचार, विनिमय सुरु झाले. त्याचा परिणाम मानवी जीवनावर झाला. त्यामुळे पारंपारिक जीवन जगण्याची पद्धत बदलून गेली.

मुंबई : आधुनिकीकरणामुळे जग जवळ आले. इतर देशांसोबत भारताचा व्यापार वाढला. नवतंत्रज्ञान, विचार, विनिमय सुरु झाले. त्याचा परिणाम मानवी जीवनावर झाला. त्यामुळे पारंपारिक जीवन जगण्याची पद्धत बदलून गेली. यंत्र मानवासारखे व्यक्तीचे जीवन हे गतीमान झाले. त्यामुळे मानवाच्या जीवन शैतीत अमुलाग्र बदल झाले. 'फास्ट लाईफच्या नावाखाली नीतिमूल्य, माणुसकी आणि आपले कर्तव्य आपण विसरत चाललोय काय?' या विषयावर 'यिनबझ'च्या अनेक ग्रुपमध्ये तरूणांनी आज मनसोक्त चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मते आणि प्रतिक्रिया आम्ही येथे देत आहोत.

आजकाल प्रत्येकजण फक्त आपले या देशातील अधिकार काय आहेत तेच सांगत असतो. पण याच देशात राहण्यासाठी काही कर्तव्य सुद्धा आहेत हे विसरतो. इथे देशप्रेम सुद्धा वर्षातून फक्त दोनच दिवस व्यक्त होते तिथे कर्तव्याची जाणीव नसणे यात काही वेगळं नाही वाटतं.
- संभाजी पाटील

तरुणाई नवा जोश असतो, एखाद्या वेळी हातून न कळत चुक होतो त्यामुळे तरुणाई माणूसकी विसरली असे म्हणणे योग्य नाही. माणूसकी, सामाजिक जाणीव तरुणाईमध्ये आजही टिकून आहे. देशावर जेव्हा राष्ट्रीय संकट येईल तेव्हा सर्व प्रथम तरुणाई धावून जाते. गेल्यावर्षी राज्यात महापूर आला अशावेळी तरुणाई मदतीसाठी धावून गेली. कोरोना काळात तरुणांनी शक्य होईल तेवढी मदत केली. समाजिक चळवळीत आजही तरुणाई पुढे असते. टिकटॉक अॅपमुळे लाखो तरुणाईला नवीन ओळख मिळाली मात्र, टिकटॉक अॅप चायनाचे असल्यामुळे सरकारने बंदी घातली. सरकारच्या निर्णयाचे टिकटॉक स्टारने समर्थन केले. यातून तरुणाईची प्रगल्भता लक्षात येते. 
-स्वप्नील भालेराव

हो नक्कीच, जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा भारत देशाचं काहीतरी देणं लागतो, पण सद्याच्या धकाधकीच्या जीवनात माणूस हा स्वतःची मौजमजा आणि चैनीच्या वस्तू मिळवण्यात व्यस्त झाला आहे. त्यामुळे तो त्याची असलेली कर्तव्ये हा दिवसेंदिवस विसरत आहे.याच कारण म्हणजे तो पैशाच्या माघे धावू लागला आणि स्वतःची असणारी नीतिमूल्ये माणुसकी आणि कर्तव्य पार विसरून गेला.
- शिल्पा नरवडे

होय आपण सर्वच फास्ट लाईफच्या नावखाली आपली नीतिमूल्य, माणुसकी आणि आपली कर्तव्य विसरलो आहेत. पूर्वी लोकांकडे आपले पण होता परंतु आता तसे काही आढळत नाही. सर्वांचे जीवन आता घड्याळ्याच्या काट्यावर चालू असते. त्यांमुळे लोकांचा एकमेकांशी संवद संपुष्टात आला आहे. त्या आता सोशल मिडियामुळे आणेख लोक दुरावली आहेत. एकमेकांसाठी वेळ काढत नाहीत कामपूर्ते फोन करायच. पूर्वी मित्र मैत्रीण एकमेकांना भेटून झाल्यावर घरी जातान सांगयचे की, पोहचला की, कॉल करत परंतु आता हे सुध्दा बंद झालं आहे. समोरून कॉल करत आणि सांगतात की, आजचे फोटो तेवढे लवकर पाठव एवढ बोलतात आणि कॉल ठेवतात साध त्याला विचारत देखील नाहीत की, पोहचला आहेस का नाही अजून तू घरी.
- रसिका जाधव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News