स्पर्धा परीक्षेपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचित राहतात का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत...
  • आज आपल्या जास्तीत जास्त मुले हे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिसतात.
  • परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थाना या परीक्षेसाठी वंचित राहतात. कारण शहरातील मुलांना सर्व सुख-सुविधा उपलब्ध असतात.

मुंबई :- आज आपल्या जास्तीत जास्त मुले हे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिसतात. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थाना या परीक्षेसाठी वंचित राहतात. कारण शहरातील मुलांना सर्व सुख-सुविधा उपलब्ध असतात. पण ग्रामीण भागातील मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे या गोष्टीपासून ते वंचित राहिले आहेत. त्यांचे स्पर्धा परीक्षेचे स्वप्न हे स्वप्न राहते. त्यांना पुस्तक घेण्यास देखील पैसे नसतात किंवा परीक्षा फी भरण्यास देखील पैसे नसतात. परंतु या मुलांना परिस्थितीमुळे या सर्व गोष्टी गमावाव्या लागतात. स्पर्धा परीक्षेपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचित राहतात का? तुम्ही या मागणीकडे कसे पाहता?... याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

होय,  सगळेच नाही म्हणता येणार पण काही प्रमाणात नक्कीच विद्यार्थी स्पर्धा परिक्षांपासून वंचित राहतात. आजही अनेक ग्रामीण भागांमध्ये विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध नाही. आजच्या आधुनिक जगात आपल्याला जास्तीत जास्त माहिती ही मोबाईल द्वारे मिळते. पण अनेक ग्रामीण भागांमध्ये नेटवर्क नसल्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती उपलब्ध होत नाही. ज्याप्रमाणे स्पर्धा परीक्षांची माहिती आपल्याला गुगल द्वारे मिळते अशीच काहीशी माहिती वर्तमानपत्राद्वारे देखील मिळत असते. परंतु,  अनेक ग्रामीण भागांमध्ये वर्तमानपत्र ही पोहोचत नाही. त्यामुळेही अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षांपासून वंचित राहतात.

 श्रद्धा ठोंबरे

हो काही प्रमाणात ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोई पुरावण्याच्या बाबतीत देश आधीच उदासीन आहे. योग्य मार्गदर्शन न भेटणं, पुस्तकांची अपुरी व्यवस्था / पुरवठा, यामुळे काही विद्यार्थी इच्छा असूनही स्पर्धा परिक्षेकडे वळत नाहीत तसेच ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने येणाऱ्या उत्पन्नातुन क्लासेस खूपच जास्तची फी घेतात पण ते भरु शकत नाहीत,  त्यानेही काही विद्यार्थी आत्मविश्वास गमवुन आणि इतर व्यावसायिक शिक्षणाकडे जातात.

विपुल जानराव

हो नक्कीच ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड मोठ्या प्रमाणात असते. परंतु ग्रामीण भागामध्ये पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहावे लागते. ग्रामीण भागामध्ये थोड्या प्रमाणामध्येच संगणकीय सेवा उपलब्ध असते, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होता येत नाही. ग्रामीण भागातील मुलांमध्ये जिद्द चिकाटी मेहनतीची तयारी भरपूर प्रमाणात असते. पण त्यांना इंटरनेट सुविधा, तसेच प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय उपलब्ध नसते. तसेच काही मुलांची आर्थिक परिस्थिती गरीब असल्याने त्यांना स्वतः पुस्तक खरेदी करणे परवडत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परिक्षेपासून वंचीत राहतात.

शिल्पा नरवडे

ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेपासून योग्य मार्गदर्शना अभावी खूप दूर आहेत. अशा ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त प्रमाणत शेती व्यवसायात आई वडिलांना मदत करतात.  पण माझं अस मत आहे की, ग्रामीण भागातील मुला-मुली साठी स्पर्धा परीक्षासाठी वेगवेगळ्या संस्था ह्यांनी पुढे यालयला पाहिजे. पण ग्रामीण भागांतील विद्यार्थी खुप मेहनत करून स्पर्धा परीक्षा पास होतात कारण ते जिद्दीने मेहनत करतात.

आपल्या आई वडीलचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते शहरात (पुणे- मुंबई) ह्या सारख्या शहरात येऊन दिवसभर स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करून रात्री कोणत्यातरी कंपनी मध्ये काम करणे किंवा वाचमेन (सुरक्षा रक्षकांचे काम करून ) आपली स्वप्न पूर्ण करतात.

महेश सोरटे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News