मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधकांना लाज वाटतेय का ? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 May 2020

आजचं आंदोलन म्हणजे येड्यांची जत्रा आहे. सर्व काळे करा असा भाजपचा आदेश आहे. पण महाराष्ट्राचे अंगण स्वच्छ आहे. त्यात महाराष्ट्राचे योध्दे लढत आहेत. तसेच कोरोना युध्दाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्याकडे राहिल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. हे आंदोलन त्यांच्या नेत्यांच्या विरोधात ठरेल हे त्यांनी लक्षात ठेवावे. 

महाराष्ट्र - राज्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढत असताना विरोधकांना मात्र राजकारण सुचत आहे. 'महाराष्ट्र बचाव आंदोलन' हाती घेऊन विरोधकांनी शिवसेनेवर टिका करायला सुरूवात केली आहे. ठाकरेंच्या हातात राज्याची सुत्रे गेल्यापासून राज्य सुरक्षित आहे अशी जनतेची भावना आहे. त्यामुळे विरोध करणा-या पक्षांपासून महाराष्ट्राला वाचवा अशी सांगण्याची वेळ आली आहे. राज्यपालांच्या अंगणात लोळण घेण्यापेक्षा विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांशी बोलायला त्यांना लाज वाटते का ? असा सवाल करत शिवसेनेने विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील सामनाच्या संपादकीयमधून जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत पाटील आणि फडणवीस यांनी भान राखून बोलावे. शहाण्या लोकांना शब्दांचा मारा पुरेसा असतो. पण विरोधकात शहाणे उरले आहेत काय ? असा सवाल सुध्दा शिवसेनेने केला आहे. संपुर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना विरोधकांनी केलेलं आंदोलन म्हणजे फालतू आंदोलन आहे अशी टीका सुध्दा शिवसेनेने केली आहे. 

आजचं आंदोलन म्हणजे येड्यांची जत्रा आहे. सर्व काळे करा असा भाजपचा आदेश आहे. पण महाराष्ट्राचे अंगण स्वच्छ आहे. त्यात महाराष्ट्राचे योध्दे लढत आहेत. तसेच कोरोना युध्दाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्याकडे राहिल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. हे आंदोलन त्यांच्या नेत्यांच्या विरोधात ठरेल हे त्यांनी लक्षात ठेवावे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News