शिकलेली मुले हुंडा घेण्यास तयार असतात का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 August 2020
  • आमची चर्चा, माझ मत...

मुंबई : हुंडा 'ही' समाजाला लागले किड आहे. दिवसेंदिवस ही कीड समाजाला पोखरत चालली. त्यामुळे मुला- मुलींचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य उद्धवस्त होत आहे. समाज सुशिक्षित झाला, सामाजाची प्रगती झाली तरी हु़्ंड्याची प्रथा कायम राहिली. शिकलेली मुले हुंडा घेण्यास तयार असतात का? याविषयी तरुणाईसोबत सोबत आज मनसोक्त चर्चा करण्यात आली. यावेळी तरुणाईने दिल्या प्रतिक्रीया आम्ही देत आहोत.

मुलगा शिकला असतो मात्र त्याचे आई-वडील हे शिकलेलें नसल्यामुळे त्याला हुंडा घेण्यासाठी मजबुर करतात. मी पूर्णपणे दोष यामध्ये आई-वडिलांना देत नाही. कारण आई-वडील जेवढे चुकीचे आहेत तेवढेच मुलेसुद्धा. एक उदाहरण देतो, समजा आपल्या घरी आपण दोघे भाऊ आहोत. एक बहीण आणि एक भाऊ, अगोदर भावाचे लग्न झाले. भावाने हुंदा घेण्यास सक्त मना केली. मात्र जेव्हा बहिणीच्या लग्नाची वेळ येते, तेव्हा समोरील व्यक्ती हा सरळ सरळ हुंड्याची मागणी करतो. तेव्हा आपण आपल्या आई-वडिलांना काय उत्तर द्यावे, हा प्रश्न नक्कीच त्या मुलासमोर पडला असेल.
- sarnath shirsat

पहिली गोष्ट म्हणजे हुंडा घेणं आणि हुंडा देणं हे कायद्याने गुन्हा आहे, आणि मझ हे मत आहे की जर शिकलेला मुलगा हुंडा घेत असेल, किंवा आई वडिलांच्या सांगण्यावरून तो हुंडा घेत असेल तर त्याला मी शिकलेला साक्षर विद्यार्थी आणि साक्षर नागरिक सुद्धा म्हणणार नाही.
- अजय भालेराव

मला काय, वाटत एकतरी त्या मुलीच्या आई वडीलांनी त्या मुलीला लहान पनापासून सांभाळाच तिला शिकवायचे, आणि परत मोठी झाल्यावर, तिला विकायचे, हे कोठे लिहले आहे. मला तर वाटतं की उलट आपण लग्न करून मुलगी घेतो उलट किती मूल्यवान दागिना घेतो त्यात हा हुंडा कशाला, तसे तर हुंडा मुलानी दिला पाहिजे कारण आपण त्यांची मुलगी घेतो, आस एक मला वाटत बर का, खर तर ही हुंडा पद्धत बंद केली पाहिजे.
- सुरज कांबळे

शासनाने जरी हुडा पद्धती बंद केली असली तरी सर्रासपणे हुडां घेणे चालू आहे. मुलाने हुंडा घेतांना मुलीकडचा थोडा विचार करायला हवा. हुडा घेण्यात काहीच मोठेपणा नाही आणि सुशिक्षित मुलांचे लक्षण नाही. आपण नेहमी आपल्या आजूबाजूच्या घडामोडी पाहत आहोत. वैवाहीत जीवनात जास्तीजास्त भांडन तंटे हुड्यामुळे होत असतात. त्याचा प्रत्यपरीत्या परीणाम वैवाहित जीवनात पडतो. ज्या पैशावर आपला कसलाही अधिकार नाही तो पैसा आपण हुड्यांच्या पद्धतीने घेतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे.
- कृष्णा गाडेकर 

मुलगा शिकलेला असो, वा अशिक्षीत महत्वाची आहे त्यांची मानसिकता. या हुंड्याच्या बाबतीत फक्तं मुलांनाचं का दोष द्यावा. मुलींची पण मागणी असते की, मुलगा नोकरी वाला पाहिजे आणि तो पण सरकारी! ही मानसिकता पण लक्षात घ्यायला हवी. मुलीच्या आई वडिलांनी हुंडा स्वछेने दिला तर घेण्यात गैर काय? पण जर हुंड्यासाठी तिचा मानसिक, शारीरिक छळ होत असेल तर मग तो गुन्हा असेल. जर हे कृत्य सुशिक्षिक असो वा अशिक्षिक कोणाकडूनही होत असेल तर तो माणूस म्हणायच्या लायकीचा नाही.
-अजय डुमनवाड

माझ्या मते स्वच्छेने दिलेल्या वस्तूला "भेट" म्हणतात हुंडा नाही. कायद्याने हुंडा घेणे आणि देणे दोन्ही गुन्हा आहेत. दुर्दैवाने हे प्रकरण आजही आपल्या देशात सुरू आहे. ही पद्धती बंद करण्यासाठी शिक्षणा सोबत सामाजिक ज्ञान हे जास्त गरजेचं आहे असा माझा ठाम विश्वास आहे. एका स्त्री ने मुलीला जन्मा दिला पण त्यात दोष तिच्या नवऱ्याचा असतो हे समजण्या साठी जीवशास्त्रय याचा अभ्यास गरजेचे आहे. परंतु, हुंडा घायचा की नाही याचं तर्क सहित बुद्धीने आपण विचार स्वतः करू शकतो.म्हणून या साठी शिक्षणासोबतच सामाजिक ज्ञान हे खूप महत्त्वाचे आहे. सुशिक्षित घरचे पण लोक हुंडा घेतात हे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज मला भासत नाही. जो पर्यंत लोक आपली मानसिकता स्वतः नाही बदलतील तो पर्यंत या पद्धती वर विराम लागू शकत नाही. म्हणून या साठी सामाजिक ज्ञान लोकांमध्ये पसरवणे अत्यावश्यक आहे.
- सर्वेश चंद्रशेखर बागडे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News