आपल्या मातृभाषेतून शिक्षणाचे 'हे' आहेत फायदे

शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
Tuesday, 12 March 2019

मराठी अभ्यासक्रम केंद्राने मुंबईत सर्वेक्षण करून ‘शिक्षणाचे मराठी माध्यम ः अनुभव आणि वास्तव वर्तमान’ या पुस्तकात त्याचा अहवाल मांडला. दुसऱ्या भागात आपल्या पाल्यासाठी मराठी माध्यम निवडणाऱ्या सुजाण पालकांचे विचार दिले आहेत. या पालकांत पत्रकार, लेखक, कवी, डॉक्‍टर, मानसतज्ज्ञ, अभिनेते असे सारेच आहेत. या सर्वांच्या विचारांचा मागोवा घेऊन कालिदास मराठे यांनी मातृभाषेतून शिक्षण देण्याचे फायदे मांडले आहेत, ते असे :

 • शाळेतील माध्यम, घरातील माध्यम व परिसराचे माध्यम हे एकच असल्यास मुलांचे शिक्षण सहज-सोपे, आकलन नीट होणारे व आनंददायी असते.
 • विचार, वृत्ती, भावना, कल्पना यांच्या आड येणाऱ्या गोष्टींना (अवरोधांना) दूर करण्याची शक्ती मातृभाषेच्या आधाराने मिळते.
 •  अभिव्यक्तीची रंध्रे मोकळी करण्याचे काम मातृभाषा करते.
 •  अवांतर वाचन ही शिक्षणाच्या दृष्टीने अगदी अत्यावश्‍यक बाब आहे आणि ती सवय मातृभाषा माध्यम असल्यास विकसित होते.
 • कुठलेही मूल नव्या संकल्पना शिकताना आपल्या सरावाच्या भाषेत त्या सहजासहजी व मुळापासून आत्मसात करणे.
 • मातृभाषेतून शिकल्याने मुलांच्या जाणिवा समृद्ध होतात. आकलनशक्ती विकसित आणि मजबूत होते.
 • एखाद्या विषयाकडे बघण्याची समज वृद्धिंगत होते.
 • मातृभाषेतून आपले विचार व भावना व्यक्त करणे मुलांसाठी नैसर्गिक व सहज घडते. ती अधिक ‘मोकळी’ होतात. विचार करण्याची शक्ती मिळते.
 • मातृभाषेत शिकल्याने विचार करणे, विश्‍लेषण करणे, निर्णय घेणे आदी क्षमता विकसित होण्यास मोलाची मदत होते.
 • प्रत्येक घटनेचे, वेगवेगळ्या घटकांचे पृथक्‍करण करून विचार करण्याचे कौशल्य मातृभाषेत शिकल्याने विकसित होते.
 • मातृभाषेत शिकल्याने व्यक्तिमत्त्व सहज फुलते, मुलांमधील उपजत गुणांची चांगली जोपासना होते.
 •  बोलण्याची/विचार करण्याची व शिक्षणाची भाषा एकच असल्याने शिकणे आनंददायी होते.
 • भाषा गंमतशीरपणे वापरणे, सहज-सोपे आहे, शब्दांशी आपण खेळू शकतो, हा आत्मविश्‍वास मातृभाषेतून शिकताना वाढत जातो.
 • आई-वडील दोघेही नोकरीसाठी बाहेर जात असल्यास मातृभाषेतून शिक्षण दिल्यास मुले अभ्यासासाठी इतरांवर अवलंबून राहत नाहीत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News