मराठी तरुणाने बनवले हुबेहूब टिकटॉक सारखे अँप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 August 2020
  • मागील काही महिन्यात भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचे संबंध बिघडल्यामुळे भारताने चिनी बनावटीच्या ५९ अँप वापरण्यावर बंदी आणली.
  • याच ५९ अँप च्या यादीत टिक टॉक ह्या व्हिडिओस बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अँप चा देखील समावेश होता.

बारामती :-  मागील काही महिन्यात भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचे संबंध बिघडल्यामुळे भारताने चिनी बनावटीच्या ५९ अँप वापरण्यावर बंदी आणली. याच ५९ अँप च्या यादीत टिक टॉक ह्या व्हिडिओस बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अँप चा देखील समावेश होता. भारतातील लाखो लोक ह्या टिकटॉक अँप चा वापर करून विविध विषयांवरील आपले १५ सेकेंदाचे व्हिडिओस बनवत होते. टिकटॉक अँप हे अनेकांचे मनोरंजनाचे साधन देखील बनले होते. टिकटॉकवर व्हिडिओस बनवणाऱ्या क्रिएटरना त्यांच्या व्हिडिओ मुळे खूप लोकप्रियता मिळाली व त्यामुळे त्यांच्या भोवती सेलिब्रिटीज प्रमाणे चाहत्यांचे वलय निर्माण झाले होते. परंतु भारत सरकारच्या चिनी अँप बंदीच्या निर्णयामुळे टिकटॉकच्या लाखो युजर्सची निराशा झाली. परंतु आता अँप बंदीमुळे निराश झालेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात राहणाऱ्या तरुणांनी हुबेहूब टिकटॉकसारखे अँप बाजारात आणले आहे. ह्या नव्या अँपचे नाव "टिक टॅक" असून राहुल खोमणे या मराठी तरुणाने भारतीय बनावटीचे हे अँप बनवले आहे. इंदापूर येथील कुल्फी विक्रेता ते आता आयटी कंपनीचा मालक अशी गरुड झेप घेतलेल्या राहुल खोमणेला त्याचे सहकारी रणजीत घाडगे, अक्षय गोरड, राहुल कदम यांनी देखील हा अँप बनवण्यासाठी मदत केली. टिक टॅक हे अँप प्ले स्टोर मध्ये उपलब्ध असून  एका महिन्यात सात हजार लोकांनी हा अँप डाउनलोड केला आहे. तसेच दहा हजार पेक्षा अधिक व्हिडिओ ह्या अँप वर अपलोड झाले आहेत. मनोरंजन व कला सादर करण्याचे केंद्रबिंदू म्हणून ह्या अँप ची निर्मिती करण्यात आली असून हे अँप मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमध्ये तयार करण्यात आले आहे. टिक टॅक ह्या अँपमध्ये  टिकटॉक प्रमाणे पॉप्युलर क्रिएटर्सना ब्लू टिक दिली जाणार असून भविष्यात टिक टॅक अँप यूजर्सना पैसे कमावून देण्याचा मानस देखील असणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News