नेट-सेट नसलेल्या प्राध्यापकांची नियुक्ती ग्राह्य : उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 July 2020
  • विद्यापीठ अनुदान आयोगाने नेट-सेट अनिवार्य करण्यापूर्वी राज्यात ज्या प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांना दिलासा देत त्यांची नियुक्ती ग्राह्य धरण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.

   

मुंबई :- विद्यापीठ अनुदान आयोगाने नेट-सेट अनिवार्य करण्यापूर्वी राज्यात ज्या प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांना दिलासा देत त्यांची नियुक्ती ग्राह्य धरण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. तसेच, नियुक्तीच्या तारखेपासून त्यांना अनुषंगिक लाभ व निवृत्तिवेतन देण्याबाबत सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे, असे उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

नेट-सेट नसलेल्या (नेट-सेटबाधित) प्राध्यापकांच्या समस्या तसेच पेन्शनसंबंधित प्रलंबित मागण्यांसंदर्भात शिवसेना प्रवक्‍त्या व आमदार मनीषा कायंदे यांनी मंत्री सामंत तसेच विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. महाराष्ट्र युनियन ऑफ सेक्‍युलर टीचर्सच्या (MUST) वरून ही बैठक झाली. याबाबत सामंत यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती कायंदे यांनी दिली. बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरव विजय, अप्पर सचिव विजय साबळे, डॉ. धनराज माने, संचालक उच्च व तंत्रशिक्षण संचालक धनराज माने हजर होते. या वेळी उदय सामंत यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून नेट-सेटबाधित सर्व निवृत्त प्राध्यापकांना त्वरित पेन्शन लागू करण्याबाबत सचिव सौरभ विजय आणि संचालक डॉ. धनराज माने यांना निर्देश दिले.

१९९१ पासून प्रश्न प्रलंबित

प्राध्यापकांना नेट-सेट अनिवार्य आहे, असा नियम यूजीसीने १९९१ मध्ये आणला व राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी चार वर्षांनंतर केली. त्यामुळे त्यापूर्वीच नियुक्त झालेल्या प्राध्यापकांचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्राध्यापकांची नियुक्ती ग्राह्य धरून त्यांना सेवेचे लाभ देण्याबाबत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार शासकीय आदेश काढावा, अशी विनंती कायंदे यांनी केली. ती मान्य करत मंत्री उदय सामंत यांनी त्याबाबत निर्देश दिले आहेत.

 

   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News