मराठमोळ्या दबंग अधिकाऱ्याची महाराष्ट्रात नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 19 September 2020

मराठमोळ्या दबंग अधिकाऱ्याची महाराष्ट्रात नियुक्ती

भारतातल्या अनेक आयपीएस अधिका-यांनी आपला जनतेवरती आपला वचक कायम ठेवला. कारण अनेक अधिका-यांनी देश, राज्य, जिल्हा, स्थानिक अशा लेवलला आपल्या कामाची छाप पाडत चांगली कामे केली आहेत. अनेक काम करताना राजकीय नेते आड येतात, परंतु संविधान पुढे करत काही अधिकारी नेत्यांना सुध्दा जुमानत नसल्याची अनेक उदाहरणं आहेत. एखाद्या ठिकाणी अधिकारी गेल्यानंतर तिथलं सगळं नीट सुरू असतं. पण लोकप्रतिनिधी तसं नको असल्याने अधिका-याची बदली करण्यात येते. महाराष्ट्रात असे अनेक अधिकारी आहेत. ज्यांनी फक्त जनतेचा फायदा डोळ्यासमोर काम केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे शिवदीप वामनराव लांडे, सध्या त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारने मोठी जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे त्यांची चर्चा सर्वत्र आहे.

बिहार केडरचे २००६ च्या तुकडीतील अधिकारी असणा-या शिवदीप लांडे यांच्यावरती महाराष्ट्र सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. नुकतच त्यांना महाराष्ट्र सरकारकडून हशतवादीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक (डीआयजी) म्हणून नियुक्त केलं आहे. यापुर्वी त्यांनी पाटणामध्ये पोलिस अधिक्षक म्हणून असताना गुन्हेगारांना सळोकीपळो करून ठेवलं होतं. कारण त्यांचं नाव ऐकताच अनेक गुन्हेगारांना गाम फुटत होता. सध्या त्यांची महाराष्ट्रात बदली करण्यात आल्याने महाराष्ट्राला चांगले दिवस येतील अशी अनेकांना आशा आहे. सध्या ते एका महिन्याचे विशेष प्रशिक्षण घेत असल्याने ९ ऑक्टोबरला पदभार स्विकारणार आहेत.

विदर्भातील अकोला जिल्ह्यात राहणारे लांडे यांनी काहीकाळ अमली पदार्थांसंदर्भात शाखेमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून काम केले. त्या कालावधीत त्यांनी अमली पदार्थांविरोधात चांगले काम केले. त्यामुळे त्याचा तिथल्या परिसरात चांगला वचक बसला. त्यांनी परिसरात अनेक ठिकाणी छापे मारले ते यशस्वी सुध्दा झाले. एका ठिकाणी छापा मारल्यानंतर त्यांनी दोन कोटींचा माल सापडला होता. महाराष्ट्र सरकारने माझ्यावरती मोठी जबाबदारी टाकली असून ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन असं लांडेंनी स्पष्ट केलं आहे.

आयपीएस अधिकारी असणाऱ्या लांडे यांनी तपास अधिकारी म्हणून नक्षलग्रस्त मुंगेरी जिल्ह्यामधून २०१० साली आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी तिथं अपर पोलीस अधिक्षक म्हणून काही काम केलं आहे. त्यानंतर त्यांची पाटणा शहरात एसपी पदावर नियुक्ती करण्यात आली. लांडे तिथं नोकरी करीत असताना सामान्य माणसांमध्ये विश्वास निर्णाण केला.

२०११ मध्ये लांडे यांची पाटण्यामधून बदली करुन त्यांना आररिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आला. ज्यावेळी त्यांची बदली करण्यात आली, त्यावेळी तेथील तरूणांनी आणि स्थानिकांनी विरोध केला होता. विद्यार्थ्यांनी आणि तरूणांनी लांडे यांच्या बदलीचा विरोध करण्यासाठी राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. त्यांच्या नावाने फेसबुकचं पेज काढण्यात आलं असून त्या पेजवरती मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत.

महाराष्ट्रात असे अधिकारी फार तुरळक प्रमाणात आहेत. जे चांगलं काम करीत आहेत, त्यांना लोकप्रतिनिधी त्रास देत आहेत असं चित्र ब-याचदा महाराष्ट्रात पाहायला मिळतं शिवदीप लांडे यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रात अनेक बदल होतील यात शंका नाही - केदार जोशी, इंजिनिअर, डाटा अॅनालिस्ट, अन्ड्रोमेडा,  

चांगला अधिकारी महाराष्ट्रात आला याचं कौतुक आहे. पण इथले लोकप्रतिनिधी त्यांना त्यांच्या पध्दतीने काम करू देतील की नाही याबाबत शंका वाटते. कारण तुकाराम मुंडे या अधिका-याचं काम पाहिल्यानंतर त्यांना किती त्रास होतोय किंवा कसा त्रास दिला जातोय हे आपण पाहतोय. शिवदीप लांडे यांनी लोकप्रतिनिधींना न जुमानता काम करावे - शेखर पाटील, व्यवसायिक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News