आवेदनपत्र भरले नाही, विभागातील १८४ शाळांची बोर्ड मान्यता रद्द

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

यंदा विभागातील शिक्षण मंडळाने ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून एकाही विद्यार्थ्याने परीक्षेसाठी अर्ज भरलेला नाही. 

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे औरंगाबाद विभागातील १८४ शाळांची, तर औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ५१ शाळा, महाविद्यालयांची बोर्ड मान्यता रद्द करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये या शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना दहावी, बारावी परीक्षेस बसता येणार नसल्याचे मंडळाचे सहायक सचिव विजय जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

यंदा विभागातील शिक्षण मंडळाने ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून एकाही विद्यार्थ्याने परीक्षेसाठी अर्ज भरलेला नाही, बंद शाळा, मंडळाला न कळविता शाळेचे स्थलांतरण केले, आवेदनपत्र भरले नाही, नवीन सांकेतांक दिला नाही, मार्च-२०१८ च्या परीक्षेत अनियमितता ठेवली अशा शाळांची यादी तयार केली होती. या शाळा, महाविद्यालयांवर कारवाईसंदर्भात भूमिका घेण्यासाठी १२ एप्रिलला मंडळाने तदर्थ समितीची बैठक घेतली. या समितीने ठराव क्रमांक ०४ नुसार विभागातील १८४ शाळा, महाविद्यालयांची मंडळ मान्यता काढून घेण्याचा निर्णय घेतला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील ५१ शाळा, महाविद्यालयांचा समावेश आहे.

औरंगाबादच्या या ५१ शाळा 
श्री शिवाजी कन्या प्रशाला (खोकडपुरा), श्री मोहटादेवी माध्यमिक विद्यालय (निपाणी), गंगागिरी महाराज विद्यालय (सातारा परिसर), मोहम्मदीया उर्दू हायस्कूल (कसाबखेडा), कर्मवीर बी. एस. पाटील विद्यालय (निलजगाव, पैठण), विद्याविकास माध्यमिक विद्यालय (सरोळा, पीर), उस्मान उर्दू हायस्कूल (आसेफिया कॉलनी), राष्ट्रपिता महात्मा गांधी शिक्षण संस्था, स्कूल (रेल्वेस्टेशन, बीड बायपास), सुयोग माध्यमिक विद्यालय (पेरे चौक, पाटोदा), ऑर्चिड टेक्‍नो इंग्रजी स्कूल (बीड बायपास), जिगीषा पब्लिक स्कूल (औरंगाबाद), एव्हरेस्ट इंग्लिश हायस्कूल (ओहर जटवाडा रोड), मोसीन अहेमद उर्दू माध्यमिक शाळा (रोशन गेट), सेंट मेरी इंग्लिश हायस्कूल (लासूर स्टेशन), श्री शिवाजी कन्या प्रशाला (रांजणगाव), सेकंडरी स्कूल (चाळीसगाव रोड, कन्नड), संभाजी विद्यालय (खाडगाव, ता. पैठण), लिट्‌ल वंडर इंग्लिश स्कूल (सिल्लोड).
कनिष्ठ महाविद्यालये ः बळीराम पाटील ज्युनिअर कॉलेज (सिडको, एन- ९), कलाम ज्युनिअर कॉलेज (बीड बायपास), देवगिरी टेक ज्युनिअर कॉलेज (औरंगाबाद), राजर्षी शाहू ज्युनिअर कॉलेज (मुकुंदवाडी), श्री मोहटादेवी ज्युनिअर कॉलेज (निपाणी), कॉलेज ऑफ टेक्‍नॉलॉजी (विद्यानगर, सेव्हनहिल), सुयोग उच्च माध्यमिक स्कूल (पाटोदा), शिवकला हायर सेकंडरी स्कूल (बजाजनगर), पद्मावती व्होकेशनल एज्युकेशन ज्युनिअर कॉलेज (टीव्ही सेंटर), प्राईम ज्युनिअर कॉलेज (कटकटगेट), गीता हायर सेकंडरी स्कूल (शिवाजीनगर), जिल्हा परिषद हायर सेकंडरी स्कूल (लासूर स्टेशन), न्यू हायर सेकंडरी स्कूल (वडगाव), हिरा भय्याज ज्युनिअर कॉलेज (जामडी), बी. औरालकर एमसीव्हीसी ज्युनिअर कॉलेज (जामडी), अंजनसागर हायर सेकंडरी स्कूल (रामनगर, पळशी, ता. कन्नड), बालयोगी काशिगिरी महाराज ज्युनिअर कॉलेज (पिशोर), श्री सद्‌गुरू योगिराज दयानंद महाराज कला ज्युनिअर कॉलेज, श्री बालयोगी काशिगिरी महाराज ज्युनिअर कॉलेज, मुक्ताराम तुपे पाटील ज्युनिअर कॉलेज, शिवछत्रपती हायर सेकंडरी स्कूल (पाचोड, ता. पैठण), श्री तेजादित्य ज्युनिअर कॉलेज (टीचर्स कॉलनी, सिल्लोड), गीताई ज्युनिअर कॉलेज (माणिकनगर, सिल्लोड), मुर्डेश्वर ज्युनिअर कॉलेज (लिहाखेडी, ता. सिल्लोड), जिल्हा परिषद हायर सेकंडरी स्कूल (पनवाडा, ता. सिल्लोड), मंगलेश्वर ज्युनिअर कॉलेज (मंगरूळ, ता. सिल्लोड), शिवराज हायस्कूल (ता. सिल्लोड), न्यू हायस्कूल ॲण्ड हायर सेकंडरी स्कूल (निल्लोड, ता. सिल्लोड), नूतन कला, वाणिज्य, विज्ञान ज्युनिअर कॉलेज (हळदा), जीवन शिक्षण हायर सेकंडरी स्कूल, साईनाथ हायर सेकंडरी स्कूल (पराला, ता. वैजापूर), कैलास पाटील हायर सेकंडरी स्कूल एमसीव्हीसी (वैजापूर), जिल्हा परिषद हायर सेकंडरी स्कूल (बाबरा, ता. फुलंब्री) या कनिष्ठ महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News