यशवंतराव चव्हाण पारितोषिकासाठी आवाहन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईतर्फे दरवर्षी राज्यातील व्यक्ती किंवा संस्थांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिकाने गौरवण्यात येते.
  • यंदा हे पारितोषिक कृषी-औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन/प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, मराठी साहित्य व संस्कृती या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती वा संस्थेला देण्यात येणार आहे.

धारावी :-  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईतर्फे दरवर्षी राज्यातील व्यक्ती किंवा संस्थांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिकाने गौरवण्यात येते. यंदा हे पारितोषिक कृषी-औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन/प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, मराठी साहित्य व संस्कृती या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती वा संस्थेला देण्यात येणार आहे.

दोन लाख रोख रक्कम आणि मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. पारितोषिकासाठी संस्था व व्यक्तींची नावे सुचविण्यासाठी व पारितोषिक नियमावलीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नावे पाठविण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२० आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News