'चिंता' हे लठ्ठ होण्याचे एक कारण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 September 2019
  • सध्याच्या सुपरफास्ट काळात बदललेली जीवनशैली हे लठ्ठपणामागचं मुख्य कारण आहे आणि हे मुख्यतः तरुणींमध्ये हे दिसून येते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात लठ्ठ होणे हा आजच्या तरुणाईच्या जीवनातील एक गहन विषय समजला जातो . मुख्यत्वे करून आजच्या तरुणाईमध्ये फिट आणि स्लिम राहण्याचे वेड असल्याने तरूणांना सतत वजन वाढते की काय ही  चिंता सतवत असते . परंतु सर्व साधारणपणे लठ्ठ होण्याची कारणे म्हणजे  बाहेरचं  फास्टफूड . परंतु फास्टफूड खाऊन वजन वाढत असले तरी साधारणतः यावेळी खाणे आणि  धावपळीच्या जीवनात आजच्या जनतेत आहाराचे संतुलन बिघडत चालले आहे. आणि  त्याचा परिणाम हा आपोआप माणसाच्या वजनावर होत आहे. तसेच आजचे तरुण करियर आणि  अभिनय क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असल्याने फिट आणि स्लिम असल्याची धडपड ते करत असतात मात्र ह्याच फिटनेस ने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. आणि या सगळ्यात तरुण तरुणी हे सतत चिंतेत असतात. खाण्यावर बंधने घालून प्रोटीन आणि कॅल्शिअमची  कमतरता त्यांच्यात जास्त प्रमाणात आढळते

.याच कारणाने तरुण तरुणी नैराश्यात जातात आणि चिंतेने ग्रासली जातात . मात्र चिंता करणे हे सुद्धा लठ्ठ होण्याचे एक कारण समजले जाते.  एका प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञांच्या मते सध्याच्या सुपरफास्ट काळात बदललेली जीवनशैली हे लठ्ठपणामागचं मुख्य कारण आहे. आणि हे मुख्यतः तरुणींमध्ये हे दिसून येते . जाडजूड दिसत असल्यामुळे तुम्ही लोकांमध्ये मिसळणं टाळत असाल तर ही चिंतेची बाब आहे. मनावर दडपण येण्याचं हे एक महत्त्वाचं कारण असून, त्यामुळे नैराश्य येऊ शकतं. पण, वजन कमी होत नसेल तर निराश होऊ नका किंवा चिंता करत बसू नका. कारण त्यातून उलट तुमचं वजन अधिक वाढू शकतं.

प्रसिद्ध मानसोपचारतज्ञानाच्या मते कामाचा आळस आणि व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणाला आमंत्रण मिळतं. या सवयींमुळे जाडजूड झालेली व्यक्ती त्यानंतर अचानक वजन कमी करायला जाते. त्यातून पदरी निराशा पडल्यास त्यामुळे आणखी टेन्शन येतं. आणि या दडपणातून वजन अधिक वाढतं. शरीराचं वजन अधिक वाढल्यामुळे त्याबरोबरच सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो. परिणामी व्यायाम (वर्कआऊट) करणं शक्य होत नाही. जाड होण्याची कारणं अनेक असू शकतात. वेळोवेळी संपूर्ण वैद्यकीय चाचण्या आणि आवश्यक त्या तपासण्या करून घेणं अत्यंत गरजेचं असतं. झटपट वजन कमी करण्याची घाई करू नये. वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली टप्प्याटप्प्यानं प्रयत्न करावेत, असा सल्लाही ते देतात.

एका वरिष्ठ कॉस्मेटीक सर्जनाच्या मते, पौष्टिक खाणं, व्यायाम आणि त्यातून मिळणारं निरोगी जीवन याला काही पर्याय नाही. तुम्ही जर यातून पळवाट शोधत असाल तर ही चूक तुम्हाला फार महागात पडू शकते.अशावेळी  वजन कमी करण्याच्या पळवाटा न शोधता नैसर्गिकरित्या किंवा घरगुती आहार तसेच योग्य असे डाएट  फॉलो करून वजन कमी करता येते .आजच्या तरुणाईने  वजन वाढल्यास चिंता करून निराश होऊ न जाता योग्य त्या डॉक्टरचा सल्ला तसेच  योग्य तो आहार आत्मसात करून तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे . 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News