अनुष्का शर्माचा सोशल मीडियाद्वारे मोहीम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 16 August 2019
  • ‘हॅशटॅग जस्टीस फॉर ॲनिमल्स’ ही नवी मोहीम सुरू
  • ‘मुक्‍या प्राण्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी
  • काही लोक प्राण्यांबरोबर अगदी दुष्ट पद्धतीने वागतात

‘झिरो’ चित्रपटाच्या अपयशानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिंदी चित्रपटाकडे फिरकलीच नाही. पण सोशल मीडियाद्वारे नेहमीच ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. अनुष्काने आता सोशल मीडियाचाच वापर करत एक नवी मोहीम हाती घेतली आहे.

प्राणिप्रेमी अनुष्काने प्राण्यांच्या बाबतीत गुन्हे करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी ‘हॅशटॅग जस्टीस फॉर ॲनिमल्स’ ही नवी मोहीम सुरू केली आहे. अनुष्का म्हणते, ‘मुक्‍या प्राण्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.

पण काही लोक प्राण्यांबरोबर अगदी दुष्ट पद्धतीने वागतात. त्यांना मारहाण करतात, ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. त्यामुळे ‘हॅशटॅग जस्टीस फॉर ॲनिमल्स’ ही मोहीम मी सोशल मीडियाद्वारे सुरू केली आहे.’ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News