अनुष्का शर्मा आता निर्मात्याच्या भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 13 March 2020

‘निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकण्याचा माझा निर्णय फारच सहज होता. काहीतरी वेगळं करणं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हाच या मागचा हेतू होता.

अनुष्का शर्मा ही बॉलीवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याबरोबरच २०१५ मध्ये तिने तिच्या ‘क्‍लीन स्लेट’ या प्रॉडक्‍शन कंपनीतून ‘एनएच १०’ या चित्रपटाची निर्मिती केली आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अभिनयसुद्धा केला होता आणि यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकनही मिळालं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटाला आणि अनुष्काला निर्मिती क्षेत्रात पाच वर्षं पूर्ण झाली आहेत.

याबाबत ती म्हणाली, ‘निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकण्याचा माझा निर्णय फारच सहज होता. काहीतरी वेगळं करणं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हाच या मागचा हेतू होता. ‘एनएच १०’ या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा माझा हेतू पूर्ण झाला आहे.’ या चित्रपटानंतर तिच्या प्रॉडक्‍शन कंपनीतून तिने ‘परी’ आणि ‘फिलौरी’ या चित्रपटांची निर्मिती केली होती. आता अनुष्का निर्माती म्हणून पुन्हा कोणत्या चित्रपटातून समोर येणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News