अनुष्का बर्थडे स्पेशल : 'या' गोष्टीमुळे विराट कोहली अनुष्का शर्मासमोर रडला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 1 May 2020

आज १ मे रोजी अनुष्का शर्माचा वाढदिवस आहे. अनुष्का शर्माचा जन्म 1 मे 1988 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे झाला. बंगळुरूमध्ये वाढलेल्या अनुष्काने आर्मी स्कूल आणि माउंट कार्मेल स्कूलमध्ये शिक्षण घेतले.

आज १ मे रोजी अनुष्का शर्माचा वाढदिवस आहे. अनुष्का शर्माचा जन्म 1 मे 1988 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे झाला. बंगळुरूमध्ये वाढलेल्या अनुष्काने आर्मी स्कूल आणि माउंट कार्मेल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तिला दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये जम बसवत असतानाअनुष्काने विराट कोहलीशी लग्न केले. दोघांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. या दोघांनीही पहिल्यांदा आपल्या नात्याबद्दल काही सांगितले नाही, परंतु नंतर अचानक लग्न झाल्यावर सर्वांना आश्चर्यचकित केले. असाच एका आश्चर्यकारक प्रसंग दोघांच्या आयुष्यात आला आहे. 

यापूर्वी अनुष्काने तिच्या लव्ह लाइफला मीडियापासून लपवून ठेवणे फायदेशीर समजले होते. 2015 पासून ती विराटला डेट करत होती. 2 वर्षांच्या डेटिंगनंतर या जोडप्याने 2017 मध्ये लग्न केले. एका स्पोर्ट्स चॅनलला मुलाखत देताना एकदा विराटने अनुष्काबद्दल काही गोष्टी व्यक्त केल्या होत्या. विराटने एक असा क्षण सांगितला होता, ज्यावेळी तो अनुष्कासमोर रडला होता.

वास्तविक कोहलीने म्हटले होते की, जेव्हा मला टीम इंडियाचा कसोटी कर्णधार होण्याची खबर मिळाली तेव्हा अनुष्का शर्मा त्याच्याबरोबर होती आणि त्यावेळी  तो अनुष्कासमोर रडू लागला. विराट अनुष्काला आपला लकी चार्म मानतो. विराटने म्हटले होते की, "मला आठवते जेव्हा मी मोहालीत होतो त्यावेळी कसोटी मालिका चालू होती, तेव्हा अनुष्का माझ्याबरोबर होती, मला मेलबर्नमध्ये कसोटी कर्णधार म्हणून नेमले होते तेव्हासुद्धा ती माझ्याबरोबर होती."

दरम्यान, अनुष्काला चित्रपटांमधून नव्हे तर मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे होते. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी अनुष्का मुंबईला आली होती. 2007 च्या फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिग्जच्या मॉडेल म्हणून तिला पहिला ब्रेक मिळाला. मॉडेलिंगनंतर अनुष्का शर्मा ही चित्रपटांकडे वळली. यशराज चित्रपटासाठी तिने ऑडिशन दिली.
                         
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसोबत पहिल्यांदा तिला  कास्ट करण्यात आले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता आणि अनुष्काच्या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तिचा दुसरा चित्रपट बदमाश कंपनीने बॉक्स ऑफिसवर एवढी चालली नाही, पण अनुष्काने बॅण्ड बाजा बारातमध्ये ती कमी भरून काढली होती. 
   
अनुष्का शर्माने पटियाला हाऊस, लेडी vs विक्की बहल, जब तक है जान, पीके, ऐ दिल है मुश्किल अशा चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारत कोणत्याही गॉडफादरची मदत न घेता अनुष्का शर्माने बॉलिवूडमध्ये आपले स्थान मिळवले. अभिनयाद्वारे बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटविणार्‍या अनुष्काने 'एनएच 10' च्या सहाय्याने प्रॉडक्शन जगतात प्रवेश केला. अनुष्काने फॅन्टम फिल्म्स आणि इरोज इंटरनेशनल सोबत मिळून आपला चित्रपट बनविला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News