मृगधारा

माधव जाधव
Friday, 7 June 2019

मृगधारा हे बाप्पा ! 
तू पेटलेला सूर्य
अंगाखांद्यावर घेऊन
उन्हाळाभर राबलास !

मृगधारा हे बाप्पा ! 
तू पेटलेला सूर्य
अंगाखांद्यावर घेऊन
उन्हाळाभर राबलास !
 काट्याकुट्यांना, दगड-धोंड्याना
ओटीपोटी घेत खपलास
ओबडधोबड  मातीला कुरवाळलास
उद्याचे हिरवे स्वप्न फूलविण्यासाठी !
 अन्तुझ्या घामाच्या धारांनी भिजवलास
मातीच्या कणा कणाला 
तिची गर्भकूस सक्षम अन् समृद्ध 
व्हावी म्हणून ...
जिवाची बाजीलावून
नांगरलास वखरलास 
चैत्र-वैशाखवनवा अंगावर घेऊन
विस्तवात पूरलेल्या वांग्यागत
भाजलास, होरपळलास,करपलास ! 
केवळ...
हिरव्या अंकूराचा हुंकार जपण्यासाठी ! 

हे अन्नदातृत्व जपण्यासाठी
काळ्या मातीत 
रक्त ओकणा-या बाप्पा ! 
तुझ्या अमीट वेदनांना पाहून 
आता आभाळात विखूरलेली ढगं 
एकत्र जमली आहेत ! 
अन् .
त्यांनाही गहिवरुन आलय, 
दुःख अनावर झालय ! 
आता...
ढगं  बिचारी तुझ्याकडे पाहून
 हंबरडा फोडीत,विजेला कवटाळून 
धाय मोकाटून रडताहेत !
 अन् कोसळताहेत
मृगाच्या जलधारा बनून !! 
ह्याला मात्र समस्त जग 
मृगनक्षत्राचे आगमन झाले म्हणून 
आनंदाने नाचतं आहे,बागडत आहे
अग्नीकूंड मुक्तीचा आनंद लुटताहेत !
वेल कम रेन ! वेल कम !! म्हणत
मृगोत्सव साजरा करीत आहेत !!

हे बाप्पा तू मात्र 
जगाच्या मुखी घास भरविण्यासाठी
कंबर कसली आहेस शेटच्या श्वासा पर्यंत ! 
अन्...
तुझ्या आत्मबलाचा महामेरू 
अढळपणे उभा आहे
तूझ्या श्रमनक्षत्रातील
घामाच्या धारांवर जगताच्या सुख,शांती-समृद्धी साठी !
जगताच्या सुख-शांती-समृद्धी साठी !!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News