प्रॅक्‍टिकलसोबतच थेअरीची अजून आवड: प्रशांत दामले 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 31 August 2019

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला साहित्य, कला संस्कृतीची मोठी परंपरा आहे. नाटकाचे प्रॅक्‍टिकल अनेक वर्षांपासून करतो आहे. तथापि थेअरी कशी शिकवतात हे जाणून घेण्याची मला आवड आहे, असे प्रतिपादन प्रख्यात नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी केले. 

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची अभिनेते प्रशांत दामले यांनी शुक्रवारी (ता.30) सायंकाळी सदिच्छा भेट देऊन संवाद साधला. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्यासह अनेक जणांनी विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग नावलौकीकास आणला, आपल्या निमंत्रणाचा मान ठेऊन विभागाला नक्की भेट देऊ असे प्रशांत दामले म्हणाले. 

कुलगुरू डॉ. येवले आणि पत्नी ज्योती येवले हे नागपूरपासून नियमित नाटकाचे चाहते असल्याबद्दल दामले यांनी आनंद व्यक्त केला. तर औरंगाबाद विद्यापीठ वगळता एकही चांगले नाट्यगृह नाटकांसाठी उपलब्ध होत नाही, याबाबद्दल खंतही व्यक्त केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News