लातूर येथील दयानंद कला महाविदयालयाचा आगळा वेगळा उपक्रम

विष्णू चांदूरे, लातूर
Tuesday, 14 January 2020

वाढत्या थंडीत रस्त्यांच्या कडेने, रेल्वे स्थानक, बस स्थानक, रुग्णालय, फुटपाथ, मंदिर परिसर अशा अनेक ठिकाणी लोक हुडहुडी भरलेल्या स्थितीत रात्र काढतात. अशा लोकांना उबदार भेट

लातूर दि १३ येथील दयानंद कला महाविदयालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गरीब गरजुना ब्लँकेट वाटप करण्यात आले. वाढत्या थंडीत रस्त्यांच्या कडेने, रेल्वे स्थानक, बस स्थानक, रुग्णालय, फुटपाथ, मंदिर परिसर अशा अनेक ठिकाणी लोक हुडहुडी भरलेल्या स्थितीत रात्र काढतात. अशा लोकांना उबदार भेट देण्यासाठी लातूर येथील दयानंद कला महाविदयालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा.रमेशजी बियाणी यांनी दिलेले ब्लँकेट शहराच्या विविध विभागात गरीब व गरजूंना वाटप करण्यात आले. यावेळी प्र.प्राचार्य डाॅ. एस. पी. गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डाॅ.आर. एम. खंदारे, चांदूरे विष्णू, मनोज आत्राम, शंकर लहाने , ज्योतीबा बडे हे उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News