भारतीय जवानांवर बनणार अजून एक मोठा चित्रपट 

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Tuesday, 4 February 2020
  • बॉलिवूडमध्ये देशप्रेम आणि सैन्यावर मोठ्या प्रमाणात बनविलेले चित्रपट प्रेक्षकांना आवडतात.
  • विकी कौशलच्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाला 2019 मध्ये आलेल्या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

नवी दिल्ली - बॉलिवूडमध्ये देशप्रेम आणि सैन्यावर मोठ्या प्रमाणात बनविलेले चित्रपट प्रेक्षकांना आवडतात. विकी कौशलच्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाला 2019 मध्ये आलेल्या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता भारतीय सैन्यावर आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. करण जोहरने आपल्या ट्विटर अकाउंटवर या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'सियाचीन वॉरियर्स' असे या चित्रपटाचे नाव आहे. त्यामध्ये, जगातील सर्वात उंचीवर असलेली युध्दभूमी सियाचीनमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या सैनिकांचे सामर्थ्य दर्शविले जाईल.

दिग्दर्शक नितेश तिवारी त्यांची पत्नी आणि दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी यांच्यासह भारतीय सैन्यावर आधारित 'सियाचीन वॉरियर्स' हा चित्रपट बनवणार आहेत.

 

करण जोहरने आपल्या ट्विटरवर चित्रपटाची घोषणा करत लिहिले की, 'माझा मित्र नितीश तिवारी आणि अश्विनी अय्यर यांचा नवा चित्रपट सियाचीन वॉरियर्स येत आहे यांचा मला फार आनंद झाला. आमच्या भारतीय सैन्याच्या शूर सैनिकांची ही कथा आहे. त्याचे दिग्दर्शन संजय शेखर शेट्टी करणार आहेत. याची पटकथा पियुष गुप्ता आणि गौतम वेद यांनी लिहिली आहे.'

हा चित्रपट 2016 मध्ये सियाचीन हिमस्खलनाच्या वास्तविक कथेवर आधारित आहे. याद्वारे 21000 फूट उंचीवर हवामानामुळे ज्या प्रकारे भारतीय सैनिकांना धोक्यांचा सामना करावा लागतो ते दर्शविले जाईल.

'सियाचीन वॉरियर्स' दिग्दर्शन संजय शेखर शेट्टी करणार आहेत. महावीर जैन यांच्यासमवेत नितेश तिवारी आणि अश्विनी अय्यर तिवारी हे चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. याबद्दल नितेश म्हणाला, 'या चित्रपटाच्या माध्यमातून मला माझ्या देशातील शूर लोकांना श्रद्धांजली वाहण्याची इच्छा आहे.  

 

सियाचीनची कथा प्रेरणादायक आहेच त्याचबरोबर देशा्च्या प्रति शौर्य, देशभक्ती आणि प्रेम परिभाषित करते .

हा चित्रपट वर्दीतील अशा शूरवीरांविषयी सांगतो जे आपले जीवन धोक्यात घालतात आणि आपले संरक्षण करतात. आम्हाला आशा आहे की ही कथा देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल.' पियुष गुप्ता आणि गौतम वेद यांनी हा चित्रपट लिहिला आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News