या अभिनेत्याचं वार्षिक उत्पन्न 3 अब्ज 65 कोटी !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020

या अभिनेत्याचं वार्षिक उत्पन्न 3 अब्ज 65 कोटी !

या अभिनेत्याचं वार्षिक उत्पन्न 3 अब्ज 65 कोटी !

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्याचं राहिणामान पाहून त्यांचं वार्षिक उत्पन्न किती असेल असा अनेकजण विचार करतात, कारण राहायला उच्चभ्रु सोसायटीत किंवा स्वत: च्या बंगल्यात, अलिशान गाड्या असं काही पाहिल्यानंतर प्रत्येकाला उत्पन्नाचा प्रश्न पडतो. त्यावर फोर्ब्ज कंपनी प्रत्येकवर्षी सर्वे करत असते. यावर्षीचा सर्वे पाहिला तर तुम्हाला आच्छर्य वाटेल. कारण अक्षयकुमार हा या वर्षात सर्वाधिक मानधन मिळविलेला भारतातील पहिला कलाकार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे जगात अक्षयकुमारचा सहावा क्रमांक लागतो.

1 जून 2019 ते 1 जून 2020 या कालावधीत फोर्ब्जने सर्वे केला. त्यामध्ये ही आकडेवारी समोर आली. जगात  डिवाईन जॉन्सन (87.5), रेयान रेनॉल्डस (71.5), मार्क वॉहलबर्ग (58), बेन एफ्लेक (55), विन डिझेल (54), अक्षयकुमार (48.5), लीन मॅन्युअल मिरांडा (45.5), विल स्मिथ (45.5), एडम सॅंडलिअर (41) जॅकी चेन (40) या कलाकारांनी इतकं मानधन मिळवलं आहे.

अक्षयकुमारने पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता तो ठरला आहे. त्याचं वार्षिक उत्पन्न ३ अब्ज 63 कोटी 3 लाख 46 हजार आहे. जाहिराती, चित्रपट आणि करार या माध्यमातून कमावलेल्या संपत्तीची मोजणी केली जाते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News