MPSC परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला होणार परीक्षा  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 7 September 2020

राज्यसेवा पुर्व परीक्षा २० सप्टेंबर आणि अराजपत्रित गट 'ब' संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होत्या. मात्र, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि शासकीय कर्माचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करुन दोन परीक्षा स्थगीक करण्यात आल्या.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियोजित राज्यसेवा पुर्व परीक्षा आणि अराजपत्रित गट 'ब' संयुक्त पूर्व परीक्षा स्थगीत केल्या. स्थगीत केलेल्या परीक्षा एमपीएससीने पुढे ढकलण्यात. आणि सुधारित वेळापत्रात आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्यसेवा पुर्व परीक्षा २० सप्टेंबर आणि अराजपत्रित गट 'ब' संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होत्या. मात्र, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि शासकीय कर्माचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करुन दोन परीक्षा स्थगीक करण्यात आल्या. या परीक्षा ११ ऑक्टोबर व २२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहेत असे एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले. या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले मात्र काही राजकीय पक्षांनी यावर टिका केली आहे.

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही विद्यार्थ्यांनी केली होती. वर्तमाणपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. बातम्यांची दखल घेऊन आयोगाने ही माहिती सामान्य प्रशासन विभागाला पत्राद्वारे कळवली. त्यामुळे एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाने या सदर्भांत एमपीएससीला पत्राद्वारे कळवले. त्यानुसार आयोगाने सुधारीत वेळापत्रक जाहीर केले. परीक्षेच्या आधी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा एमपीएससी घेणार आहे. त्यानंतर सामान्य प्रशासनाला ही माहिती कळवली जाणार आहे. सरकराने दिलेल्या सुचना लक्षात घेऊन परिक्षेचे आयोजन केले जाईल अशी माहिती एमपीएससीने दिली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News