7 हजार विद्युत सहायक, उपकेंद्र पदांची प्रलंबित निवड यादी जाहीर करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 June 2020
  • ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे महावितरणला आदेश

मुंबई : महावितरणमध्ये विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक पदाच्या सात हजार जागांची भरती प्रक्रिया गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढील आठवड्यात या सर्व पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्याचे आदेश महावितरणला दिले आहे. यामुळे प्रलंबित निवड प्रक्रियेतील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

महावितरण कंपनीमध्ये जुलै 2019 मध्ये उपकेंद्र सहायक पदाच्या दोन हजार आणि विद्युत सहायक पदाच्या पाच हजार अशा एकूण सात हजार पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये 25 ऑगस्ट 2019 रोजी उपकेंद्र सहायक पदासाठी आयबीपीएस या संस्थेकडून परीक्षा घेण्यात आली आहे; तर विद्युत सहायक पदासाठी परीक्षा न घेता केवळ दहावीच्या गुणानुक्रमानुसार निवड करण्यात येते. त्यानंतर या दोन्ही पदांच्या सात हजार जागांच्या सरळसेवा भरतीची प्रक्रिया प्रलंबित आहे. राज्यातील सुमारे दीड लाख आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या सात हजार जागांसाठी अर्ज भरलेले आहेत; मात्र गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून भरती प्रक्रिया प्रलंबित असल्याने उमेदवारांनी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News