सुशांत सिंगचं 'हे' स्वप्न अंकिता लोखंडे पुर्ण करणार; चाहते होऊ शकतात सहभागी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 10 September 2020

सुशांत सिंगने एकूण पन्नास स्वप्न पाहिले होते. त्यातले एक स्वप्न म्हणजे 1 हजार वृक्ष लागवड करण्याचे होते. सुशांतची बहीन आणि अंकिताने काही रोपे विकत घेतली आहेत. ती रोपे लावण्याच काम अंकिता करणार आहे.

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी अर्ध्यावर आपली जीवन यात्रा संपवली. उमेदीच्या काळात सुशांतने अनेक स्वप्न पाहिले होते मात्र, अचानकपणे जगाचा निरोप घेतल्यामुळे सुशांतचे अनेक स्वप्न अधुरे राहिले. सुशांतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची बहीण आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे सरसावली आहे.

सुशांत सिंगने एकूण पन्नास स्वप्न पाहिले होते. त्यातले एक स्वप्न म्हणजे 1 हजार वृक्ष लागवड करण्याचे होते. सुशांतची बहीन आणि अंकिताने काही रोपे विकत घेतली आहेत. ती रोपे लावण्याच काम अंकिता करणार आहे. त्यामुळे सुशांतच एक स्वप्न पुर्ण होईल अशा विश्वास अंकिताने व्यक्त केला.

सुशांतचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी अंकिताने चाहत्यांना जास्तीजास्त झाडे लावण्याची विनंती केली. सोशल मीडियावर  #Plants4SSR नावाने मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद  दिला. तीन दिवसापूर्वी अंकिताने सुशांतच्या नावे झाडे विकत घेतली आणि त्याची लागवड केली. भविष्यात झाडे जगण्याची जबाबदारी अंकिता पार पाडणार आहे.  

दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्यामुळे वृक्ष लागवड करणे हा एकमेव उपाय असल्याचे पर्यावरण तज्ञांनी सांगितले. जास्तीत जास्त झाडे लावून पर्यावरण संतुलीत ठेवण्याचे आवाहन शासन करीत आहे. गेल्या वर्षी सरकारने 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहिम जोपर्यंत लोकचळवळ होत नाही, तोपर्यंत मोहिम यशस्वी होणार नाही असे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांपासून ते सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांनी या मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News