अंकाई टंकाई किल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 August 2020
  • अंकाई आणि टंकाई हे जोड किल्ले आहेत.
  • एकाच खिंडीने वेगळ्या झालेल्या दोन डोंगरांवर हे किल्ले बांधलेले आहेत.
  • या डोंगररांगेजवळून जाणाऱ्या सुरत-औरंगाबाद व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.

अंकाई आणि टंकाई हे जोड किल्ले आहेत. एकाच खिंडीने वेगळ्या झालेल्या दोन डोंगरांवर हे किल्ले बांधलेले आहेत. या डोंगररांगेजवळून जाणाऱ्या सुरत-औरंगाबाद व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्यांवरील अगस्ती मुनींचा आश्रम, ब्राम्हणी, जैन लेणी या किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात. मनमाड पासून केवळ १० किमीवर आणि धार्मिक स्थान असल्यामुळे किल्ल्यावर सुट्टीच्या दिवसात भाविकांचा वावर असतो. त्यामुळे सकाळी लवकर अंकाई किल्ला पाहुन मग टंकाई किल्ला पाहावा. कारण टंकाई किल्ल्यावर भाविक / पर्यटक फारसे येत नाहीत.

अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहून निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासून ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते.

दुसऱ्या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही. अंकाई, गोरखगड, कात्रा या किल्ल्यांची माहिती साईटवर लिहिलेली आहे.

अनकाई डोंगरावर अगस्ती ऋषींचा आश्रम होता. किल्ल्यावर असलेली ब्राम्हणी (हिंदु) लेणी आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली दहाव्या ते बाराव्या शतकातील जैन लेणी किल्ल्याच्या प्राचीनत्व सिध्द करतात. या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकीर्दीत झाली अस मानल जात.

इ.स. १६३५ मध्ये मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकून घेतला. सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावरचा हा महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे मुघलांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा किल्ला होता. मुघलांकडून हा किल्ला निजामाकडे गेला. इ.स. १७५२ मध्ये भालकीच्या तह नुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News