लवकरच अनिल कपूर त्याच्या नव्या भूमिकेत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 December 2019

नुकताच अनिलने त्याचा ६३ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनिलच्या ‘मलंग’ चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याने या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले

अभिनेता अनिल कपूरच्या ‘पागलपंती’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. आता लवकरच तो ‘मलंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

नुकताच अनिलने त्याचा ६३ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनिलच्या ‘मलंग’ चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

त्याने या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले असून, त्याचा हा फर्स्ट लूक पाहून कळून येते की, तो या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत आहे. या फर्स्ट लूकमध्ये अनिल पोलिसाच्या वर्दीमध्ये असून लाल चश्‍मा लावून हसताना पाहायला मिळत आहे.

या चित्रपटात अनिलसोबत अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री दिशा पटानीदेखील झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी यांचे आहे. अनिलला या चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News