आता 'या' कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये Android 11 उपलब्ध; जाणून घ्या! कसे करावे अपडेट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 September 2020
 • आता काही विशिष्ट कंपनींच्या स्मार्टफोनमध्ये अन्ड्राईड ११ उपलब्ध होणार आहे.

मुंबई : तरुणाईला स्मार्टफोनमध्ये नवनवीन फिचर हवे असतात. त्यासाठी तरुण नेहमी नव्या शोधात असतात, अशा तरुणाईसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ॲंड्रॉईड ११ हे नवीन फिचर सर्वप्रथम गुगल फिक्सल फोनमध्ये लॅंन्च करण्यात आले. आता काही विशिष्ट कंपनींच्या स्मार्टफोनमध्ये अन्ड्राईड ११ उपलब्ध होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ॲंड्रॉईड ११ नवीन सॉक्टवेअर डेव्हलप करण्यात आले. आणि जून महिन्यात युजर्ससाठी उपलब्ध झाले. मात्र ज्यांच्याकडे गुगल फिक्सल बीटा आहे अशा मर्यादीत युजर्सना ॲंड्रॉईड  ११ अपडेट करता येत होते. त्यानंतर ॲंड्रॉईड ११ सॉक्टवेअरमध्ये मोठे बदल करण्यात आले. बीटामध्ये चेंज करुन वन प्लस, जिओमी, ओपो आणि रियलमी कंपन्यांच्या स्मार्टफोनध्ये अन्ड्राईड ११ व्हर्जन अपडेट करता येणार आहे..

या फिक्सेलमध्ये ॲंड्रॉईड ११ अपडेट करता येणार

 • फिक्सेल 2,  फिक्सेल 2 एक्सएल 
 • फिक्सेल 3,  फिक्सेल 3 एक्सएल 
 • फिक्सेल 3A,  फिक्सेल 3A एक्सएल 
 • फिक्सेल 4,  फिक्सेल 1A एक्सएल (कायदेशीर भारतीय फोनमध्ये उपलब्ध नाही) 

या स्मार्टफोनमध्ये ॲंड्रॉईड ११ अपडेट करत येणार

 • वन प्लस 8, वन प्लस 8 प्रो
 • झिओमी 10, झिओमी एमआय 10 प्रो
 • ओपो फाईन्ड X2, ओपो फाईन्ड X2 प्रो, ओपो एस 2,  ओपो रेनो 4G, ओपो रेनो 3 प्रो 4G
 • रियलमी X50 प्रो

ॲंड्रॉईड ११ कसं कराव इंस्टॉल

वर दिलेल्या हॅडसेटमध्ये ॲंड्रॉईड ११ इंस्टॉल करणे सोपे आहे. त्यासाठी फोन सेटिंग मध्ये जावे त्यानंतर > सिस्टम> आणि सिस्टम अपडेट वर क्लिंक करावे.ॲंड्रॉईड ११ फाईल 8.8 एमबी वजनाची आहे. सहज फोनमेमरी आणि इंटरनल मेमरी स्टोरोजमध्ये बसू शकते. थर्ड पार्टीकडे अपडेट प्रोसेसर उपलब्ध आहे. त्यामुळे कंपनीच्या कस्टमर केअरला संपर्क केल्यास अधिक माहिती मिळू शकते. 

ॲंड्रॉईड ११ ची वैशिष्ट्यै

 • ॲंड्रॉईड ११ व्हर्जनमध्ये विज्यूलपासून ते फिचरपर्यत अनेक बदल करण्यात आले.
 • जनतेशी सतत कनेक्ट राहण्यासाठी चॅट बबल्स स्किनवर दिसणार आहेत. फेसबुक मॉसेंजर सारखं हे असेल.
 • स्मार्ट डिव्हाईस कंट्रोल फिचर देण्यात आले. त्याद्वारे मोबाईल नियंत्रिक करु शकता.
 • प्राईव्हसी करिता वन टाईम परमिशन आणि ऑटो रिसेंट फिचर देण्यात आले. ऑपल आणि आयफोनच्या धर्तीवर हे फिचर काम करणार आहे. कोणतेही अॅप वैयक्तिक माहिती आणि लॉकेशन एक्सेस करत असेल तर तात्काळ युजर्सला माहिती मिळणार आहे. त्यामुळे अॅपवर नियंत्रन ठेवणे सोपे झाले.
 • डार्ममोडला टायमिंग लावून ठेवता येतो
 • नोटीफिकेशनला कस्टमसाईज करण्याची सोय आहे
 • महत्त्वाचे अॅप पिन करुन ठेवू शकता.
 • ॲंड्रॉईड ऑटो व्हायरलेस काम करणार आहे. त्यासाठी केबल किंवा फोन कनेक्ट करण्याची आवश्यकता नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News