आणि, व्हेलेंटाईन दिवस 'त्यांच्या' नावाने साजरा केला... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 February 2020

शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल तरुणवर्गातून आपल्या परीने वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले.

सिंधुदुर्ग : काल चौदा फेब्रुवारी होता अर्थात व्हेलेंटाईन दिवस. तरुणाईसाठी विशेष असा दिवस, ज्या दिवशी तरुणवर्ग आपल्या प्रेमासाठी कृतज्ञ राहतो. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ या दिवसाला घालवतो. मात्र १४ फ्रेब्रुवारी २०१९ हा दिवस भारतीय सैन्यसाठी काळा दिवस ठरला होता. एकावर्षांपूर्वी याच दिवशी काश्मीरमधील पुलवामा जिह्यात सीआरएफ जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला होता. सीआरएफ जवानांच्या चाललेल्या ताफ़्यावर एका स्कॉर्पीओ कारणे हल्ला केला ज्यामध्ये २०० किलो स्फोटके होती. या स्फोटकांचा झालेल्या स्फोटात सीआरएफचे ४४ जवान शहीद झाले होते. 

शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल तरुणवर्गातून आपल्या परीने वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. कृषी महाविद्यालय दापोली येथील सिंधुदुर्ग वसतिगृहातील तरुणांनी वसतिगृहातच जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी वसाहतीगृहातील तरुणांनी एकत्र येऊन देशभक्तीपर गाणी गायिली. वसतिगृहातील हे तरुण सामाजिक कार्यामध्ये आपला हातभार लावतात. वसतिगृहातील या तरुणांनी काल जवानांना श्रद्धांजली वाहत व्हेलेंटाईन दिवस त्यांच्या नावाने साजरा केला.  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News