...आणि तृतीयपंथीयांमध्ये वाहिलं शिक्षणाचं वारं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 23 September 2020

...आणि तृतीयपंथीयांमध्ये वाहिलं शिक्षणाचं वारं

प्रत्येक जण आपल्या कामानं व कर्तृत्वानं जसा श्रेष्ठ असतो. तसंच गौरीनं आपलं नाव एका वेगळा गोष्टीसाठी लोकांच्या मनात कोरलं आहे. मालाडच्या मालवणी भागात "सखी चार चौघी' ही तृतीयपंथी आणि वेश्‍यांसाठी काम करणारी संस्था गौरी चालवतात. गौरी सावंत हे नाव आजच्या घडीला सर्वांना माहीत आहे. गौरी ही पहिली अशी तृतीयपंथी व्यक्ती आहे की, जिनं एका बॉलीवूडच्या जाहिरातीमध्ये काम केलं; तसंच तिनं "कौन बनेगा करोडपती'मध्ये जाण्याचा पहिला मान मिळवला आहे. प्रत्येक जण आपल्या कामानं व कर्तृत्वानं जसा श्रेष्ठ असतो. तसंच गौरीनं आपलं नाव एका वेगळा गोष्टीसाठी लोकांच्या मनात कोरलं आहे. मालाडच्या मालवणी भागात "सखी चार चौघी' ही तृतीयपंथी आणि वेश्‍यांसाठी काम करणारी संस्था गौरी चालवतात.
 
पहिली घटना म्हणजे मालवणी-मालाड परिसरात राहणाऱ्या एका वेश्‍येचा मृत्यू झाल्याची बातमी गौरी यांना समजली. तिनं घेतलेलं कर्ज वसूल करण्यासाठी सावकारानं तिच्या घरातील सर्व सामानाचा लिलाव केला आणि पैसे वसूल केले. त्यातूनही पैशाची वसुली होत नसल्यानं सावकारानं वेश्‍येच्या चिमुरडीला विकायला काढली. ते पाहिल्यानंतर गौरीचा राग अनावर झाला आणि मी त्यांना तिथून सावकाराला हाकलवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमलेल्यांनी प्रश्‍न उपस्थित केला, की गायत्रीचा सांभाळ कोण करील. त्यानंतर मी हिला सांभाळेन, असं बोलून टाकलं. कारण - कोणीतरी नातेवाईक येऊन हिला घेऊन जाईल, हा माझा उद्देश होता. पण, मी जे पाहिलं होतं, त्यामुळे सगळं मन बदलून गेलं. या बायकांच्या मुलींसाठी काहीतरी करायला हवं, असं मी ठरवलं. या शरीरविक्रय करणाऱ्या बायकांच्या मुलींना वृद्ध तृतीयपंथी सांभाळतील, अशी गौरी सावंत यांची भावना तयार झाली होती.
 
एका रात्रीत गायत्री माझ्यासोबत झोपली आणि माझ्या गालावरून हात फिरवून तिनं मला आईपणाची जाणीव करून दिली. त्यानंतर तिच्यासोबत गप्पा मारणं, केस विंचरणं या तिच्या कामांत गौरी सावंत सावंत व्यग्र होत गेली आणि दोघींमधला जिव्हाळा वाढत गेला. गायत्रीला शाळेत घातलं, तेव्हा ती लहान होती; मात्र तिचे हावभाव आमच्यासारखे होऊ लागले. कारण- तिच्या प्रत्येक पालक मीटिंगला गौरी जात असे. तेव्हा तिथे गेल्यानंतर ती हातवारे करत असल्याची तक्रार शिक्षकांनी गौरी समोर मांडली. हे प्रकार पाहत असताना मीही आईचा आकार घेत होते. गायत्री लहान असताना माझ्या काही मैत्रिणींनी गायत्रीचा मेकअप तृतीयपंथींसारखा केल्यानं गौरी पूर्णपणे हादरून गेली. त्यानंतर गौरीने गायत्रीला हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. आता सध्या गायत्री लोणावळ्यातील एका चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहे.
 
गौरी सावंत मागील १० वर्षांपासून पाच हजार तृतीयपंथीयांमध्ये राहत आहे. तिथे राहून त्यांच्यासाठी सुखसोई पुरविणे, तसेच त्यांना एचआयव्हीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गौरी करत आहे. कारण- इथे राहणारे सर्व तृतीयपंथी उदरनिर्वाहासाठी सेक्‍स करतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गौरीची जबाबदारी आहे. सखी चार चौघी ही संस्था मी सुरू केली आहे.
 
सध्या सखी चार चौघी या संस्थेची जबाबदारी तरुण सहकाऱ्यांवर सोपवली आहे. त्यातून गौरीला जे ध्येय गाठायचं होतं, ते त्या सहकाऱ्यांना समजून सांगितलं आहे. तसंच संस्थेमुळे अनेक तृतीयपंथीयांना शिक्षणाची दारं पुन्हा नव्यानं खुली झाली आहेत. कर्ज काढून घेतलेल्या जागेवर वृद्ध झालेल्या हिजड्यांसाठी केव्हातरी या जागेत काही करायचं, असं ठरवून गौरीनं ही जागा घेतली. मी सुरू केलेल्या दोन्ही संस्थांमधून आज बऱ्याच तरुण तृतीयपंथीयांना आणि बेवारस तरुणांना शिक्षणाची दिशा मिळत आहे. याचा आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही. - गौरी सावंत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News