'अपोलो-11'ने उड्डाण केलं, अन् आमच्या काळजाचा ठोका चुकला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 21 July 2019
  • २० जुलै १९६९ या ऐतिहासिक दिवशी ‘अपोलो-११’ या अवकाशयानाचे ईगल मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत असताना अचानक त्यातील इंधन संपले अन्‌ आमच्या काळजाचा ठोका चुकला.

२० जुलै १९६९ या ऐतिहासिक दिवशी ‘अपोलो-११’ या अवकाशयानाचे ईगल मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत असताना अचानक त्यातील इंधन संपले अन्‌ आमच्या काळजाचा ठोका चुकला. तेव्हा आम्ही चंद्राच्या पृष्ठभागापासून शंभर फूट उंचीवर होतो. मॉड्यूलची इंधन टाकी जवळपास कोरडी झाली होती. हे सगळे ह्युस्टनमध्ये बसलेल्या ‘नासा’च्या संवादकाला समजत होते. प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरण्यासाठी आमच्याकडे केवळ साठ सेकंद शिल्लक राहिली होती. चांद्रभूमीवर उतरण्याच्या तयारीत असलेल्या नील आर्मस्ट्राँगला ही गोष्ट सांगून मला त्याला डिस्टर्ब करायचे नव्हते.

यानंतर आर्मस्ट्राँगने मॉड्यूलचे नियंत्रण आपल्या हाती घेतले आणि हे मॉड्यूल काळजीपूर्वक चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याचा तो प्रयत्न करू लागला. ते मॉड्यूल खाली खडकावर जाऊन आदळले असते तर ही मोहीमच फसली असती. अखेरीस महत्प्रयासानंतर तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आम्हाला यश आले आणि ह्युस्टनमधील नियंत्रण कक्षानेही पुढे जाण्यासाठी हिरवा कंदील दर्शविला. पण यामुळे काही काळ आमच्या हृदयाचा ठोका चुकला होता. अवघ्या तीस सेकंदांमध्ये हे मॉड्यूल नव्वद फुटांपर्यंत खाली आले होते, त्यामुळे शेवटच्या दहा फुटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी केवळ २३ सेकंदांचा अवधी शिल्लक राहिला होता. (चांद्रयानाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष कार्यक्रमात बोलताना) 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News