...अन् बेजार मी झालो

स्वाती ठोंबरे
Tuesday, 27 August 2019

हात तो जोरात
दाबला गेला त्या वेळी,
सूज होती चार दिवस
काय सांगू वेदना ती...

लाजली तू सखे
अन घायाळ मी झालो,
स्वप्नांत तूच दिसे अन
रात्री बेजार मी झालो...

गोड तुझे बोल सखे
काळीज खलास होई,
तुझी आठवण सखे
दिन रात तूच आठवी...

मन माझे चोरले तू
हृदयात तूच खरी,
तुझ्यासाठी प्रिये
एक कविता मी केली...

शब्द तुझे सखे गोड
गारुड माझ्या उरी,
काय बोलू तूच माझी
मधुर प्रिया खरी...

रोज तुझे स्वप्न सखे
ध्यास तुझा हर क्षणी,
काय सांगू मनीची व्यथा
दिसेना मग अजून कुणी...

असाच एकदा सखे
बोलत होतो मी तुझ्याशी,
मनीचे सगळे सांगितले 
हिय्या करुन त्या वेळी...

हलकेच तुझा हात धरला
आनंद दाटला उरी,
जोराचे ढकलले कुणी
फेकलो पलंगा बाहेरी...

हात तो जोरात
दाबला गेला त्या वेळी,
सूज होती चार दिवस
काय सांगू वेदना ती...

राग तो काढला
बायकोने त्या रात्री,
तुझ्या आठवणीत प्रिये
बायकोच होती सामोरी...

झालो आता पुरता
बेजार प्रिये मी,
सूज उरली हाती
आठवण तुझी बरी...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News