'संभाजी'मधील अनाजी पंत 'पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 30 December 2019

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील रोलबाबत बोलताना कोकाटे म्हणाले की, अनाजी पंतांच्या रोलपेक्षा हा रोलही लोकांना चीड आणेल असाच आहे.

'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून नावारूपाला आलेले अनाजी पंत म्हणजेच अभिनेते महेश कोकाटे हे आता 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतून पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहेत.
2019 मध्ये छोट्या पडद्यावर अनेक मराठी मालिका आल्या आणि गेल्या. यातील काही पात्रं रसिकांच्या पसंतीस उतरली, तर काही पात्रांनी त्यांचा रोष ओढवून घेतला.

ही पात्रं रसिकांच्या डोक्यात जाणारी ठरली. त्यापैकी एक पात्र म्हणजे अनाजी पंत. 'झी मराठी' वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय असलेल्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील हे पात्र. या मालिकेतील अनेक पात्रांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली. मात्र, यातील अनाजी पंत हे पात्र प्रेक्षकांच्या डोक्यात जाणारं ठरलं.

अष्टप्रधान मंडळापैकी एक सदस्य असलेल्या अनाजी पंतांच्या रोलची फक्त मालिकेपुरतीच नाही तर सोशल मीडियावरही चर्चा झाली. अभिनेते महेश कोकाटे यांनी अनाजी पंतांची भूमिका या मालिकेत साकारली आहे. आणि त्यांनी ती भूमिका एवढी वठवली आहे की, प्रेक्षकांना कोकाटेंचा राग येत आहे. अनेक ठिकाणी कोकाटे यांना प्रेक्षकांचा राग सहन करावा लागला, असे त्यांनी आपल्या मुलाखतीमधून सांगितले.

2019 हे वर्ष खरंच अनाजी पंतांचं राहिलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याला कारणही तसेच आहे. अनाजी पंतांची भूमिका साकारल्यानंतर आता अभिनेते  महेश कोकाटे आणखी एका निगेटिव्ह भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'झी मराठी'वरच सध्या सुरू असलेल्या 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत ते निगेटिव्ह भूमिका साकारत आहेत. 

मुख्य पात्रा इतकंच निगेटिव्ह पात्रालाही प्रेम मिळाल्याचं कोकाटे यांनी एका मुलाखतीप्रसंगी सांगितलं. आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत आपण कधीही निगेटिव्ह भूमिका केली नव्हती. मात्र, डॉ. अमोल कोल्हे आणि प्रताप गंगावणे यांनी या रोलसाठी निवड केली आणि माझ्याकडून ती भूमिका करवून घेतली. ही भूमिका करताना कधीकधी मलाही अनाजी पंतांचा राग येत होता, असंही कोकाटे दिलखुलासपणे सांगतात. 
 

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील रोलबाबत बोलताना कोकाटे म्हणाले की, अनाजी पंतांच्या रोलपेक्षा हा रोलही लोकांना चीड आणेल असाच आहे. चांगल्या फॅमिलीमध्ये विष कालवणाऱ्या, नालायक आणि लंपट माणसाचे कॅरेक्टर यामध्ये मी साकारत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News