तुमच्या मोबाईलमधील अँप करणार कोविड १९चे निदान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020
  • हातात असणाऱ्या स्मार्ट फोन चा उपयोग आपण  दैनंदिन जीवनात विविध कामांसाठी करत असतो.
  • सध्या कोरोना महामारीच्या काळात आपल्याला  मोबाईल अँपच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टींची माहिती एका क्लीक द्वारे मिळत आहे.

मुंबई :-  हातात असणाऱ्या स्मार्ट फोन चा उपयोग आपण  दैनंदिन जीवनात विविध कामांसाठी करत असतो. सध्या कोरोना महामारीच्या काळात आपल्याला  मोबाईल अँपच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टींची माहिती एका क्लीक द्वारे मिळत आहे. येत्या काळात तुमचा हाच बहुपयोगी स्मार्ट फोने तुम्ही कोरोना बाधित आहात की नाही याचे निदान करू शकणार आहे. मास्क आणि सॅनिटायझर प्रमाणेच तुमच्या मोबाईलमधील अँप तुमचे कोरोना विषाणूपासून संरक्षण करून अवघ्या ३० सेकंदात कोरोनाचे निदान करु शकते. ध्वनी लहरींद्वारे कोरोनाचे निदान करणारे हे अँप एका इस्राईल कंपनीने तयार केले असून सर्व्हरच्या माध्यमातून ही टेस्ट होऊ शकते. 

त्यामुळे आता स्वॅब टेस्ट, अँटीजन टेस्ट, अँटीबॉडी टेस्ट, एक्ससरे यानंतर ध्वनी लहरींद्वारे देखील कोरोनाची टेस्ट होण्याची शक्यता आहे. आवाजद्वारे कोरोनाचे निदान करणाऱ्या या यंत्राला वोकल बायोमार्क टेस्ट असे म्हणतात. ध्वनी लहरीं वरून होणारी ही कोरोना टेस्ट इस्राईल आणि अमेरिका यासारख्या देशांमध्ये ही उपयुक्त ठरली आहे. तर इस्राईल मधील ८०% रुग्णांवर ही चाचणी यशस्वी झाली आहे. हे अँप आपल्या मोबाईलमध्ये डॉउनलोड करताच ठराविक सेकंदांपर्यंत आपली वोकल टेस्ट घेण्यात येईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून हाय, मिडीयम आणि लो रिस्क अश्या तीन वर्गात त्याचा निकाल दिला जाईल. मुंबईतही अशा तंत्राच्या प्रायोगिक कोरोना चाचणीकरीता एथिक कमिटीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. कमिटीने ह्या तंत्राची प्रायोगिक चाचणी करण्याची परवानगी दिल्यास पुढच्या आठवड्यापासून नेस्कोच्या जम्बो केअर सेंटर मधील कोरोना संशयित आणि कोरोना रुग्णांची आवाजाची तपासणी केली जाणार आहे. या ध्वनी चाचणीमुळे अवघ्या ३० सेकंदामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोविड विषाणू आहे कि नाही यासंबंधित माहिती मिळणार असून,  आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून मुंबईतील कूपर हॉस्पिटलमधील दोन हजार व्यक्तींवर ही चाचणी होणार आहे. 

जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षण दिसू लागतात तेव्हा त्या व्यक्तीला श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागतो आणि यामुळे त्याच्या फुप्फुसांना सूज  येऊन त्याच्या आवाजामध्ये ही फरक जाणवू लागतो. अश्यावेळेस वोकल बायोमार्क टेस्ट केल्यामुळे त्याव्यक्तीला कोरोना झाला आहे कि नाही हे समजते. अशाप्रकारची वोकल बायोमार्क टेस्ट ही पुढील काळात शाळा, कॉलेज, शॉपिंग मॉल, थिएटर यासारख्या ठिकाणी उपयोगी ठरू शकते असे मत डॉ नीलम अन्ड्राडे यांनी व्यक्त केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News