राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत झाली वाढ, केंद्रीय क्रीडामंत्री यांनी दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020
  • आज २९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • आपल्या जादुई खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचा दबदबा निर्माण करणाऱ्या मेजर ध्यानचंद यांची आज जयंती.

नवी दिल्ली :- आज २९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या जादुई खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचा दबदबा निर्माण करणाऱ्या मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. भारतीय हॉकीत ध्यानचंद यांनी दिलेलं योगदान लक्षात घेता २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. आजच्या दिवशी वर्षभरात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. याव्यतिरीक्त खेळाडूंची कारकिर्द घडवणाऱ्या प्रशिक्षकांचाही द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त त्यांना अभिवादन करत, भारतीय हॉकीसाठी त्यांनी दिलेले योगदान देश कधीही विसरणार नाही असे म्हटले आहे.

 

केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनीही आज नवी दिल्लीतील ध्यानचंद स्टेडीयमवर उभ्या असलेल्या ध्यानचंद यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. आजच्या दिवशी क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात आल्याची घोषणाही केली. या वर्षापासून अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना अनुक्रमे १५ आणि २५ लाखांचे मानधन दिले जाणार असल्याचं रिजीजू यांनी जाहीर केले.

 

 

राष्ट्रपती भवनात आजच्या दिवशी सर्व पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येतो. मात्र यंदा देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आज राष्ट्रपती भवनात पार पडणारा कार्यक्रम हा व्हर्च्युअल पद्धतीने पार पडला जाणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News