राजपुत्र स्टेजवर येताच तरळलं आई आणि बहिणीच्या डोळ्यात पाणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 January 2020

अगदी धुमधडाक्यात अमित ठाकरे यांच लॉन्चिंग आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. गोरेगावातील नेस्लो ग्राउंड वर राज ठाकरे त्यांच्या कुटुंबासह उपस्थित होते.

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशानंतर आता राजपुत्र अमित ठाकरे यांनी आज राजकारणात प्रवेश केला. अगदी धुमधडाक्यात अमित ठाकरे यांच लॉन्चिंग आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. गोरेगावातील नेस्लो ग्राउंड वर राज ठाकरे त्यांच्या कुटुंबासह उपस्थित होते. सकाळी नऊ वाजता राज ठाकरे , मातोश्री कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, स्वतः दस्तुरखुद्द अमित ठाकरे, पत्नी मिताली ठाकरे आणि बहिण उर्वशी ठाकरे यांच्यासह दाखल झाले.

मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्याचा ठराव मांडला. अमित राज यांच्या नावाची घोषणा होता सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. अमित ठाकरे शिक्षणाचा ठराव मांडत होते आणि ते जेव्हा सर्वांसोबत बोलत होते त्याच वेळी त्यांच्या आई शर्मिला आणि बहीण उर्वशी यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

गेल्या वर्षभरापासून अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रीय झाले होते. नवी मुंबईत झालेल्या आंदोलनातही त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. मात्र त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. मात्र आता ठाकरे घराण्याचा हा नवा सदस्य राजकारणात आपली काय जादू दाखवतात आता हेच पाहावे लागणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News