या मालिकेवर अमेय खोपकरांची सडकून टीका 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

मुंबई ही मराठी नसून हिंदी भाषिक असल्याचे संभाषण मालिकेत करण्यात आले. त्यामुळे मराठी अस्मितेच्या मुद्दयांवर राजकारण करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षानी तर अत्यंत कडक अशी भूमिका घेतली आहे.  

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि  चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हे सध्या वेगळ्याच कारणावरून चर्चेत आहेत. "तारक मेहता का उलटा  चष्मा" या मालिकेवरून सध्या प्रचंड गदारोळ माजला आहे. नुकताच या मालिकेतील  एका एपिसोडमध्ये मराठी या भाषेचा अवमान करणारे वक्तव्य करण्यात आले.

त्यामुळे "सब टीव्ही" या वाहिनीवरील प्रदर्शित झालेला या मालिकेवर सध्या टीकेचा भडीमार सुरु आहे. या मालिकेतील एका एपिसोडमध्ये मराठी भाषेविषयी नकारात्मक उद्गार काढण्यात आले. तसेच मुंबईच्या मराठी अस्मितेला देखील तडा जाईल असे भाष्य केले गेले.

मुंबई ही मराठी नसून हिंदी भाषिक असल्याचे संभाषण मालिकेत करण्यात आले. त्यामुळे मराठी अस्मितेच्या मुद्दयांवर राजकारण करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षानी तर अत्यंत कडक अशी भूमिका घेतली आहे.  तसेच या मालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेनी तर सडकून टीका केली आहे.

महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तर या मालिकेवर अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली आहे. तारक मेहता नसून ही तर मारक मेहता नावाची मालिका आहे असे उद्गार अमेय खोपकरानी काढले आहेत. तसेच या मालिकेविषयी अत्यंत कठोर शब्दात टीका केली आहे. अशा आशयाचा संवाद साधणारे हे अतिशय नीच प्रवृत्तीचे आहेत त्यांना त्यांची जागा ही लवकरच दाखवून देऊ अशा आशयाचे मत अमेय खोपकर  यांनी " तारक मेहता का उलटा चष्मा " या मालिकेविषयी मांडले.

तसेच या मालिकेमध्ये काम करणारी मंडळी मराठी भाषेविषयी गळचेपी कशी काय खपवून घेतात अशी देखील खंत अमेय खोपकर यांनी व्यक्त केली. तसेच मराठी भाषेचा दुस्वास करणाऱ्या या नीच प्रवृत्तीला आपण लवकरच ठेचून काढू असे  देखील उद्गार त्यांनी काढले. त्यामुळेवादाच्या भोवऱ्यात सापडलेली "तारक मेहता का उलटा चष्मा" या मालिकेबद्द्दल सब टीव्ही वाहिनी नेमकी काय  भूमिका घेते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News