देशातला एकमेव मराठी माणुस वापरतो अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षांची गाडी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

देशात गाड्यांचे वेड असलेली माणसे असंख्य आहेत. क्रूजर, लॅंबोरगिनी इतक्याच नाही तर हजारो गाड्या देशात आणि देशाच्या बाहेर स्वत:ची ओळख निर्माण करताना दिसत आहे.

देशात गाड्यांचे वेड असलेली माणसे असंख्य आहेत. क्रूजर, लॅंबोरगिनी इतक्याच नाही तर हजारो गाड्या देशात आणि देशाच्या बाहेर स्वत:ची ओळख निर्माण करताना दिसत आहे. अशाच एका गाडीची क्रेझ सध्या देशात सुरू आहे, ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वापरत असणारी कॅडिलॅक एस्केलेड

कॅडिलॅक एस्केलेड गाडीची वैशिष्ट्ये...
एकदम आरामदायी, सर्व सुविधांनी परिपुर्ण असेलेली, सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण असणारी गाडी म्हणजे कॅडिलॅक एस्केलेड. गाडीमध्ये बसल्यानंतर फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये बसल्याचा अनुभव येतो. वैशिष्ट्यपूर्ण उद्देशाने बनवलेल्या लेदरच्या सिट्स, ट्रायझोन असलेला क्लायमेंट कंट्रोल अशा अनेक सुविधांनी ही गाडी परिपूर्ण आहे.

खास व्हीव्हीआयपी लोकांसाठी परिपूर्ण वैशिष्ट्याने बनवलेल्या या गाडीची किंमतसुध्दा तितकीच महाग आहे. कॅडिलॅक एस्केलेड या गाडीची किंमत चक्क 5.23 कोटी इतकी आहे.

कोण हा मराठी माणुस
भारतात पहिली गाडी घेण्याचा मान भिवंडीतल्या अरुण पाटील यांना मिळाला आहे. अरुण पाटील तसेच भारतातील सर्वच नेते, कार्यकर्ते, उद्योजक आणि सेलिब्रेटी यांनी या गाडीचे बूकिंगे केले होते, मात्र त्यासर्वांमध्ये फक्त मराठमोळ्या अरूण पाटील यांच्या दारी ही गाडी उपस्थित झाली, त्यामुळे कॅडिलॅक एस्केलेड सारखी एकदम ब्रॅंडेड आणि दिमाखदार गाडीचा मान भारतात सगळ्यात आधी मराठी माणुस अरुण पाटील यांना मिळाला हे नक्की...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News