अमेरिकन टेनिस स्पर्धा संयोजकांचा स्टार नसलेल्या टेनिसपटूंच्या धैर्यास सलाम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 August 2020
  •  अमेरिकन टेनिस स्पर्धा संयोजकांनी आपल्या स्पर्धेस प्रतिसाद देणाऱ्या स्टार नसलेल्या टेनिसपटूंच्या धैर्यास सलाम केला आहे.

 न्यूयॉर्क:  अमेरिकन टेनिस स्पर्धा संयोजकांनी आपल्या स्पर्धेस प्रतिसाद देणाऱ्या स्टार नसलेल्या टेनिसपटूंच्या धैर्यास सलाम केला आहे. त्यांनी पहिल्या फेरीतील पराजित खेळाडूंची रक्कम तीन हजार डॉलरनी वाढवली आहे; पण त्याच वेळी विजेत्यांची बक्षीस रक्कम एकंदर साडेआठ लाख डॉलरने कमी करण्याचे ठरवले आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत अमेरिका अजूनही आघाडीवर आहे; पण त्यानंतरही तेथील ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धा वेळापत्रकानुसार होणार आहे. त्यांनी स्पर्धेच्या पारितोषिकाची रक्कम केली आहे; पण त्याचा जास्त फटका सुरुवातीच्या फेऱ्यात खेळणाऱ्या तसेच स्पर्धा होत नसल्याने चांगलाच आर्थिक फटका बसलेल्या खेळाडूंना होणार नाही, याची काळजी घेतली आहे.

बक्षीस रकमेचे वाटप करताना अमेरिकन टेनिस संघटना, एटीपी तसेच डब्ल्यूटीए यांच्यासह चर्चा केली. या बक्षिसातून खेळाडूंना काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य लाभेल, याचा विचार करण्यात आला आहे, असे संयोजकांनी सांगितले. त्यांनी कोरोनामुळे स्पर्धा न झाल्याचा आर्थिक फटका बसलेल्या खेळाडूंच्या मदतनिधीसाठी 66 लाख देण्याचे ठरवले आहे.

दृष्टिक्षेपात बक्षिसे
- यंदा एकंदर बक्षीस 5 कोटी 34 लाख डॉलर, गतवर्षी 5 कोटी 72 लाख
- पुरुष आणि महिला एकेरीतील विजेत्यास प्रत्येकी तीस लाख, गतवर्षीच्या तुलनेत 8 लाख 50 हजारांनी घट
- उपविजेत्या खेळाडूस 19 लाखऐवजी 15 लाख
- दुहेरीतील विजेत्या जोडीस 7 लाख 40 हजारऐवजी 4 लाख
- पहिल्या फेरीतील पराजित खेळाडूस 61 हजार, गतवर्षी 58 हजार
- दुसऱ्या फेरीतील पराजितासाठी 1 लाख; तर तिसऱ्या फेरीतील पराजितासाठी 1 लाख 63 हजार, गतवर्षीचीच रक्कम
- चौथ्या फेरीतील पराजित खेळाडूस 2 लाख 80 हजारऐवजी 2 लाख 50 हजार, उपांत्यपूर्व फेरीतील पराजितास 5 लाखऐवजी 4 लाख 25 हजार, उपांत्य फेरीतील पराजितास 9 लाख 60 हजार ऐवजी 8 लाख

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News