ऍमेझॉन मालक जेव्हा भारतात करतात पार्सल डिलिव्हरी

सकाळ (यिनबझ)
Sunday, 19 January 2020

जगात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत असलेले ऍमेझॉन मालक जेफ बेझोस सध्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भारतातील मोठ्या उद्योजकांच्या गाठी भेटी घेतल्या.

मुंबई: जगात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत असलेले ऍमेझॉन मालक जेफ बेझोस सध्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भारतातील मोठ्या उद्योजकांच्या गाठी भेटी घेतल्या. अगदी बॉलीवूड कलाकारांचीही त्यांनी भेट घेतली. मात्र भारत दौऱ्यात ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी स्वतः त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोत ते काम करताना पाहायला मिळत आहेत. अनेकांना प्रश्न पडला की ते नक्की काय करत आहेत. 

 

जेफ यांनी ऍमेझॉन वरून बुक केलेली वस्तू  स्वतः त्यांच्या किराणा मालाच्या दुकानात जात त्यांच्या हातात पार्सल दिले. हाच फोटो त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम वर शेअर करताच हजारो लाईक्स मिळाले आणि जवळपास पाचशेहून अधिक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुंबकर तर त्यांच्या कामाचं कौतुक करत आहेत.

भारतात बरीच दुकानं आहेत जी ऍमेझॉनची त्यांच्याशी भागीदारी आहे. ऍमेझॉन च्या साईटवरून ऑर्डर केलेल्या वस्तू ह्या सर्वात आधी दुकानदारांना मिळतात आणि त्यानंतर लोकं दुकानदारांकडून वस्तू विकत घेतात. त्यामुळे दुकानदारांना दोन पैस जास्त मिळतात, असे जेफ म्हणाले.

जेफ हे ऍमेझॉन चे CEO आहेत. जेफ बेझोस यांनी भारतातील दहा लाखाहून अधिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचा शब्द दिला.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News