अमर हिंद सह ओम समर्थ यांची उपांत्य फेरीत धडक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

लायन्स क्‍लब ऑफ माहीमने विद्यार्थी क्रीडा केंद्रच्या सहकार्याने घेतलेली ही स्पर्धा परळच्या लाल मैदानात सुरू आहे. 

मुंबई :  अमर हिंद मंडळ, युवक क्रीडा मंडळ, विद्यार्थी क्रीडा केंद्र व ओम समर्थने मुंबई जिल्हा किशोर अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. लायन्स क्‍लब ऑफ माहीमने विद्यार्थी क्रीडा केंद्रच्या सहकार्याने घेतलेली ही स्पर्धा परळच्या लाल मैदानात सुरू आहे. 

उपांत्यपूर्व फेरीचे निकाल - अमरहिंद ः ७ (विघ्नेश कोरे ६ मि. आणि ६ मि., रोहन जाधव नाबाद १ मि. आणि १ गुण, पार्थ चव्हाण ३ गुण) वि. वि. सरस्वती स्पोर्टस्‌ क्‍लब ः ६  (प्रतीक इंदुलकर २ मि. आणि ३ मि., भूषण खांबे ३.४० मि.). युवक क्रीडा मंडळ ः १४ (अमित पालने २ मि., २.३० मि. आणि ३ गुण,  ओंकार घवाळी नाबाद २.४० मि. आणि २ गुण, राज सुर्वे २.२० मि. आणि ३ गुण) वि. वि. वैभव स्पोर्टस्‌ क्‍लब ः १० (आदित्य पाटील १.५० मि. आणि ४ गुण, वेदांत नागवेकर २.३० मि., आणि १.४० मि.). 

विद्यार्थी क्रीडा केंद्र ः ९ (अथर्व पालव ३.२० मि., अथर्व फाटक १.२० मि. आणि २ गुण, सुबोध पाटील नाबाद १.४० मि. आणि १ गुण) डावाने विजयी वि. ओम साईश्वर सेवा मंडळ ः ३ (राजेश मंडल १.५० मि. आणि १ गुण, नितेश अष्टमकर १.१० मि.). ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर ः ६ (श्रेयस सौंदळकर नाबाद ७ मि., ३.१० मि. आणि ३ गुण, संयम साळवी १ मि. आणि १ गुण, पार्थास खैरे ०.५० मि. आणि १ गुण) डावाने विजयी वि. श्री समर्थ व्यायाम मंदिर ः ४ (अथर्व खोचाडे ३.३० मि. 
आणि १ गुण)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News