अमान आफताब चिमुकल्याने धरले रमजानचे रोजे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 23 May 2020

या छोट्याश्या चिमुकल्याच्या श्रध्देला घेऊन त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

मुंबई : अमान आफताब या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याने रमजानच्या पवित्र महिन्यातील पहिल्या दिवसापासून रोजे (उपवास) धरणे सुरु केले आहे. शेवटच्या रोजापर्यंत तो रोजे पूर्ण करणार आहे असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. या छोट्याश्या चिमुकल्याच्या श्रध्देला घेऊन त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

यावर्षी मे च्या अतिशय कडक उन्हाळ्यात मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सरु झाला. मुंब्रा (ठाणे) जीवन बाग येथील राहणारे आफताब आलम मुकादम यांचा मुलगा अमान याने रमजानच्या पवित्र महिन्यातील रोजा पूर्ण करत आहे. अमान सध्या प्ले स्कूलमध्ये शिकत आहे.

पहाटे साडेचार वाजता सैहरी करून दिवसभर प्रखर उन्हाळ्यात अन्नपाणी न घेता चिमुकला आपले रोजे थेट सायंकाळी कुटुंबियांसोबत प्रार्थना करुन पूर्ण करत आहे. त्याबद्दल त्याच्या नातलगांकडून कौतुक होत आहे. अमानचे वडील आफताब आलम यांनी अल्लाहाचे आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News