मी आहे ना...

मंगेश ढाणे, सातारा
Tuesday, 11 August 2020

Everything is fine आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात... प्रत्येक गोष्टीमागे काही तरी कारण असतं... कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात...

Everything is fine आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात... प्रत्येक गोष्टीमागे काही तरी कारण असतं... कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात... नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते? याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही...

जी नाती तायर होतात ती आपण जीवापाड जपावी... आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायुची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसं... रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो, पण आपणलेपणाच्या नात्यात तसं नसतं... Its mutual relation… मन जळलं की, आपलेपणाचे नातं होते...

जे बंध खूप स्ट्राँग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत... आपण खूप वाईट परिस्थितीतून कधीच तुटत नाहीत... आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे “मी आहे ना” एवढे शब्द संजीवानीसारखे काम करतात...अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं... पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे हो... नात्यांनी समृद्ध होणं तितकंच कठीण... Keep in touch

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News