अँजिओग्राफीला पर्यायी तपासण्या आहेत

डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ
Wednesday, 4 September 2019
  • काही कारणास्तव अँजिओग्राफी करावयाची नसेल तर ही तपासणी हा एक उत्तम पर्याय आहे. या तपासणीसाठी ऍडमिट व्हावे लागत नाही; परंतु अत्यंत सौम्य स्वरूपाच्या किरणोत्सर्गाचा धोका असू शकतो.

न्यूक्लिअर स्ट्रेस टेस्ट (थॅलियम टेस्ट) : ही तपासणी हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीतपणे होत आहे किंवा नाही ते दर्शविण्याची एक पद्धत आहे. यामध्ये आपल्याला ट्रेडमिलवर अथवा औषधे (डब्यूटामाइन) देऊन व्यायाम करायला सांगितले जाते. हा व्यायाम उच्च पातळीला पोचल्यावर किरणोत्सर्गी आयसोटोपचे (टेक्निशियम ९९ सेष्टमीबी)इंजेक्शन दिले जाते आणि ‘एके स्कॅन’मध्ये घालून हृदयाची छायाचित्रे काढली जातात. यालाच न्यूक्लिअर स्ट्रेस इमेजिंग असे म्हणतात.

गुडघेदुखी अथवा अन्य कारणांमुळे ट्रेडमिल स्ट्रेस टेस्ट शक्य होत नाही, तेव्हा या तपासणीचा उपयोग होतो. ही तपासणी अँजिओग्राफीला पर्याय नाही तर पूरक आहे. अँजिओग्राफीमध्ये हृदयामध्ये मध्यम स्वरूपाचा ब्लॉक असतो. त्यानंतर पुढे काय करायचे आहे ते कळण्यासाठी म्हणजेच त्या ब्लॉकेजची तीव्रता आणि महत्त्व कळण्यासाठी या तपासणीचा उपयोग होतो. काही कारणास्तव अँजिओग्राफी करावयाची नसेल तर ही तपासणी हा एक उत्तम पर्याय आहे. या तपासणीसाठी ऍडमिट व्हावे लागत नाही; परंतु अत्यंत सौम्य स्वरूपाच्या किरणोत्सर्गाचा धोका असू शकतो. या तपासणीमध्ये ठळक प्रमाणात दोष दाखविल्यास कोरोनरी अँजिओग्राफी करून त्याची खात्री करावी लागते.

न्यूक्लिअर स्ट्रेस टेस्ट (थॅलियम टेस्ट) आणि कोरोनरी अँजिओग्राफी यामध्ये काय फरक आहे? एक तपासणी केल्यावर दुसरी करण्याची आवश्यकता भासते का?कोरोनरी अँजिओग्राफीमध्ये आपण रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचा अभ्यास करतो आणि त्यात काही अडथळे (ब्लॉकेजेस) आहेत का ते बघतो. याविरुद्ध न्यूक्लिअर स्ट्रेस टेस्टमध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा होतो का नाही ते कळते. यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिनीतील अडथळे (ब्लॉकेजेस) कळत नाहीत; पण उदा. एखाद्या रक्तवाहिनीमध्ये ७०% अडथळा आहे आणि न्यूक्लिअर स्ट्रेस टेस्टमध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित दिसत असेल तर आहे तर समजावे की तो ब्लॉक हा महत्त्वाचा नाही. अशावेळी थॅलियम टेस्ट नकारात्मक असेल तर अँजिओप्लास्टीची गरज भासत नाही. 

कोरोनरी अँजिओग्राफी ही रुग्णालयात दाखल होऊन करावयाची तपासणी आहे, तर न्यूक्लिअर स्ट्रेस टेस्ट ही बाह्यरुग्ण विभागात करतात. हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल तर पुढे अँजिओप्लास्टी अथवा बायपास शस्त्रक्रिया करून काही उपयोग आहे का, ते कळण्यासाठी  या  तपासणीचा उपयोग 
होतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News