प्रेग्नेंसीच्या नवव्या महिन्यात सुद्धा आहे, फोटोसुटच क्रेज... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 January 2020

लिजा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून ती व तिचा पती दिनो ललवानी हे दोघंही बाळासाठी खूप उत्सुक आहेत. तिने बिकनी घालून एक फोटो शेअर केलाय, ज्याचं कॅप्शन तिने दिलंय की 'any day now'. तिच्या आणकी एका फोटोत तिचा लहान मुलगा दिसतोय, ज्यात तिने लिहिलंय की दोन बाळं फोटोबॉम्ब करत आहेत.

नवी दिल्ली : सध्या सामान्य लोकांसह बॉलिवूडमधल्या तारकाही प्रेग्नंसी फोटोशूट करताना दिसतात. आपलं फोटोशूट कसं खास होईल याकडे सगळे भर देताना दिसतात. नुकत्याच एका बॉलिवूड अभिनेत्रीने प्रेग्नंसी फोटोशूट करत आपलं बेबी बम्प सोशल मीडियावर शेअर केलंय. 

'ए दिल है मुश्किल'फेम लिजा हेडन ही नऊ महिन्यांची प्रेग्नंट आहे. तिने असे काही प्रेग्नंसी फोटोशूट केलंय की सगळे बघतंच राहिले. लिजाने बिकनी घालून फोटोशूट केलंय. नववा महिना असल्याने तिचं पोट चांगलंय दिसतंय. लिजा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून ती व तिचा पती दिनो ललवानी हे दोघंही बाळासाठी खूप उत्सुक आहेत.

तिने बिकनी घालून एक फोटो शेअर केलाय, ज्याचं कॅप्शन तिने दिलंय की 'any day now'. तिच्या आणकी एका फोटोत तिचा लहान मुलगा दिसतोय, ज्यात तिने लिहिलंय की दोन बाळं फोटोबॉम्ब करत आहेत. तिचे फोटो फार गोड असून सर्वजण तिच्या बाळाची प्रतिक्षा करत आहेत.  

पहिल्या मुलासोबतचे फोटो लिसा नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. आता लिसा दुस-यांदा आई होणार आहे. लिसाने ही बातमी सर्वांना सांगितल्यानंर बॉलिवूडच्या अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोनम कपूर, एमी जॅक्सन, पूजा हेगडे, गौहर खान अशा अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News