बेदामाचे पेढे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 1 September 2020
 • आता तुम्ही तुमच्या घरी बेदामाचे पेढे करू शकतात.
 • बाहेरील दुकानांच्या सारखे पेढे तुम्ही तुमच्या घरी सुध्दा करू शकतात.

आता तुम्ही तुमच्या घरी बेदामाचे पेढे करू शकतात. बाहेरील दुकानांच्या सारखे पेढे तुम्ही तुमच्या घरी सुध्दा करू शकतात.

 

साहित्य :-

 • १ कप बदाम
 • १ कप साखर
 • अर्धा कप दूध
 • केशर
 • चमचाभर तूप
 • सुकामेवा
 • केशरकाड्या 

 

कृती :-

मी बदाम कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवले होते, इथल्या गार हवेत खराब होत नाहीत. जर उष्ण हवामानात करत असाल तर अगदी कडकडीत पाण्यात तासभर भिजवून घ्या. दूध गरम करून त्यात केशर खलून घ्या. चांगले भिजले की, बदाम काहीसे फुगून मऊ होतात आणि सालंही सहज निघून येतात. मग सोललेले बदाम, साखर आणि दूध एकत्र करून ब्लेन्डरमधून छान बारीक वाटून घ्या. वाटताना लागल्यास चमचा-दोन चमचे दूध आणखी घालू शकता.

जाड बुडाच्या कढईत मंद ते मध्यम आचेवर अगदी चमचाभरच तूप घालून त्यावर बदामाचे मिश्रण घाला. सतत ढवळत रहा. आपण दूध फार घातलेलेच नसल्यामुळे मिश्रण आळायला लगेच सुरुवात होते. मिश्रणाचा गोळा व्हायला लागला आणि कडा कोरड्या व्हायला लागल्या की, विस्तवावरून उतरवा आणि हाताला झेपेल इतपत गार होऊ द्या.

पेढ्यांऐवजी वड्या आणि कतली करायची असेल तर विस्तवावरून उतरवल्यावर तुपाचा हात लावलेल्या ताटली किंवा ट्रेमध्ये थापा आणि थंड झाल्यावर वड्या पाडा.
पेढ्यांसाठी थोडं गार झाले की, मिश्रण चांगले घोटून घ्या. मग हाताला पुसट तूप लावून घेऊन पेढे वळा. पेढे वळताना वरून सुकामेवा / केशरकाड्या वगैरे लावा.

टिपा :-

 • साखर चवीनुसार कमीजास्त करू शकता.
 • कुठल्याही वड्या करताना सुरुवातीला थोडी कमीच साखर घालावी आणि मिश्रण विस्तवावून उतरवल्यावरही किंचित ओलसर वाटले तर पिठीसाखर मिसळून घोटावे, म्हणजे छान वड्या पडतात.
 • बदाम भिजवण्याचा वेळ ३० मिनिटांत अर्थातच धरलेला नाही.
 •  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News