राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांकरीता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा द्या ; युवसेनेची मुख्यमंत्रांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 July 2020

महाराष्ट्राच्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांकरीता दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रयत्न करीत असतात. यावर्षी राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ही जुलै महिन्यात होणार होती परंतु, कोरोनाच्या पाश्वभूमीवर ही पूर्व परीक्षा सप्टेंबर महिन्यात होईल असे सांगण्यात आले होते. MPSC च्या पूर्वपरीक्षांकरिता यावर्षी ३ लाख ८० हजार विद्यार्थी बसणार आहेत.

मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांकरीता दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रयत्न करीत असतात. यावर्षी राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ही जुलै महिन्यात होणार होती परंतु, कोरोनाच्या पाश्वभूमीवर ही पूर्व परीक्षा सप्टेंबर महिन्यात होईल असे सांगण्यात आले होते. MPSC च्या पूर्वपरीक्षांकरिता यावर्षी ३ लाख ८० हजार विद्यार्थी बसणार आहेत. ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे या आधीच निश्चित करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी दरवर्षी ह्या परीक्षेची तयारी करण्याकरीता मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये येत असतात त्यामुळे विद्यार्थी  ते शिकत असलेलेच ठिकाण परीक्षा केंद्र म्हणून निवडत असतात. परंतु आता कोरोना विषाणूच वाढत संकट लक्षात घेता केंद्रीय लोकसेवा आयोगा प्रमाणेच  राज्यसेवा आयोगाने देखील  विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा द्यावी अशी मागणी युवासेनेने मुख्यमंत्रांकडे केली आहे.

 

मागील तीन ते चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याकारणाने मोठ्या शहरांत शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी आपल्या मुळगावी निघून गेले आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सध्या वाढत चालला आहे आणि त्यात सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेकरिता विद्यार्थी त्यांनी निवडलेल्या परीक्षा केंद्रावर पोहोचतील कि नाही यात शंका आहे. म्हणून कोरोनाच्या पाश्वभूमीवर विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन राज्यसेवा आयोगाने विद्यार्थ्यांना १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेकरिता परीक्षा केंद्र बदलण्याची संधी द्यावी, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या जिल्ह्यातील अथवा शहरातील जवळपासच्या परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देऊ शकतील.

 

शिवसेनेच्या युवा सेनेचे मुंबई विद्यापीठाचे सिनेट प्रदीप सावंत, महादेव जगताप, शीतल देवरुखकर, शशिकांत झोरे यांनी मुख्यमंत्र्यांना या बाबतीत पत्र लिहून ही मागणी केली आहे. युवासेनेचे प्रदीप सावंत म्हणतात, कि सध्या कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि अश्या परिस्थिती गावी गेलेले विद्यार्थी परीक्षा देण्याकरिता मुंबई, पुण्यासारख्या शहरात आले तर त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु जर राज्यसेवा आयोगाने विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्र बदलण्याची संधी दिली तर विद्यार्थी त्यांच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देऊन शकतात. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षांसंदर्भांत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्याचा निर्णय राज्यसेवा आयोगाने  लवकरात लवकर  घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली  आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News